01:57am | Jan 25, 2020 |
सातारा : मालगाव, ता. सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 21 रोजी अतुल वसंत आवळे (वय 32, रा. मालगाव) यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. घरातून 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसर्या घटनेत दि. 23 जानेवारी रोजी सकाळी सदरबझार येथील समर्थ प्लाझा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून 6 लाख 13 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास करणार्या चोरट्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 23 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान सदर बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तिजोरीमधील 6 लाख 13 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार निलेश सुरेशराव सरनाईक (वय 37) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
तिसर्या घटनेत गोळीबार मैदान परिसरामध्ये असणार्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 6 हजार 300 रुपयांचे सोन्या-चांदीचे व पितळ याचे साहित्य लंपास केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहेबराव ज्योतीराम जाधव (वय 71, रा. कांचन व्यंकटेश हाउसिंग सोसायटी, गोळीबार मैदान) यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून मुख्य दरवाजाच्या कोंयडा कशाने तरी काढून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 6 हजार 300 रुपयांचे सोन्याचे चांदीचे व पितळेचे साहित्य लंपास केले. ही घटना आठ महिन्यांपूर्वी घडली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |