सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनंत अडचणी आहेत. सेवा रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे स्थानिक वाहन चालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. तर लांब पल्याच्या वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवून पुढे जावे लागते. असे असतानाही लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोल वसुलीचा दरवाढीचा झटका देण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष न घातल्यास कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवार दि. १ एप्रिल पासून हा नवीन टोलदर वाहन चालकांच्या खिशावर पाच रूपयांपासून ते पंधरा रूपयांपर्यंत डल्ला मारणार आहेत. त्यामुळे टोलनाका वसुलीच्या ठेकेदारांना आता आपल्या राजकीय आश्रय असणार्या नेत्याच्या प्रचाराला मदत करणे, म्हणजे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार घडणार आहे. यामध्ये मासिक प्रवासासाठी असणारे शुल्क यामध्ये फारसा बदल झाला नसला तरी, १४० कि.मी. सातारा व पुणे हद्दीत असणार्या आनेवाडी व खेड-शिवापूर सध्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वादाच्या भोवर्यात सापडला होता. त्यावर निवडणूकीच्या तोंडावर पडदा पडला आहे. या टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिकांना प्राध्यान द्यावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. परंतु ज्यांची गुंठभर जमीन सुद्धा या महामार्गावर गेलेली नाही, अशा लोकांना टोल वसुलीचा ठेका काही राजकीय नेत्यांच्या बगलबच्चांना देवून स्थानिकांवर अन्याय केला आहे. दुर्दैवाने विरोधकांनी सुद्धा नांगी टाकल्यामुळे ‘ईकडे आड, तिकडे विहिर’ अशी स्थानिकांची अवस्था झाली आहे.
आनेवाडी व खेड-शिवापूर याठिकाणी स्थानिक भुमीपुत्र शेंगा, शुद्धपाणी, काकडी, स्टॉबेरी, बॉबी अशी खाद्य पदार्थ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. तर स्थानिक राजकीय नेत्याच्या आश्रयाखाली असणारे व सातत्याने दमदाटी, खंडणी, खुणाची धमकी, हप्ते वसुली अशा अनेक गुन्ह्यांमध्ये जेलवारी करणारे सध्या या टोलनाक्याचे व्यवस्थापन पाहत आहेत. सध्या निवडणूकीचा जोर असून स्थानिक मतदारांनी मतदान यंत्रणाद्वारे अशा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी विरोधात मतदान घेतल्याची खळबळ माजली आहे. दरम्यान स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये वाढत्या तक्रारी प्रवाशांच्या येऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने पोलिस खाते विरूद्ध नाराजी पसरली आहे. अशी माहिती महामार्गावरील दोन एक्कर जमीन गेलेल्या आनेवाडी, मर्ढे, रायगाव येथील शेतकर्यांनी सागितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |