03:39pm | Aug 17, 2019 |
सातारा : वारंवार तक्रार, निवेदने देवूनही प्रशासन कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ वडूथ, ता. सातारा येथे वडूथ, आरळे, शिवथर, आरफळ, बोरखळ या गावांतील ग्रामस्थांनी जोपर्यंत सातारा लोणंद रस्ता तसेच कृष्णा नदी पुलावर पडलेले खड्डे कायमस्वरुपी दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात यावी, या मागणीसाठी रस्ता रोको केला.
वडूथ व परिसरातील गावांमधील ग्रामस्थांनी 1 ऑगस्ट रोजी सातारा-लोणंद रस्ता, कृष्णा नदीवरील पुलावर खड्डे पडून पुलाची झालेली दुरवस्था व पुलाशेजारील भरावावर संरक्षक कठड्याचे काम तातडीने करावे अन्यथा 16 ऑगस्ट रोजी कृष्णा नदी पुलावर रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने याची कसलीही दखल न घेतल्याने वडूथ व परिसरातील सर्वच गावांमधील ग्रामस्थांनी रस्ता रोको करुन प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला. गेली दोन वर्ष सातारा-लोणंद रस्त्याची अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली असून वेण्णा तसेच कृष्णा नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्याचबरोबर रस्त्याचीही दयनीय अवस्था होत आहे. पुलावर खड्डे पडल्याने पूल कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा लेखी निवेदनेही देण्यात आली आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्रांमधूनही याविषयी आवाज उठवण्यात आला होता. तरीही प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक या अत्यंत ज्वलंत अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची कसलीही दखल न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता राहुल अहिरे आंदोलनादिवशीच पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. जोपर्यंत संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत व लेखी पत्र देत नाहीत, तोपर्यंत रस्ता रोको करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यानंतर तब्बल 1 तासाने सहाय्यक अभियंता राहुल अहिरे यांनी आंदोलनस्थळी न येता तसे पत्र फॅक्स करुन पाठवले. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. आज दि. 17 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, वडूथ पोलीस व परिसरातील ग्रामस्थांची बैठक होवून या कामासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
कृष्णा नदीवरील पूल हा 175 वर्षांचा पेशवेकालीन ऐतिहासिक दगडी पूल आहे. याच पुलावरुन पुणे, निरा व बारामतीकडे टोल वाचविण्यासाठी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. त्यामुळे सातारा-लोणंद रस्त्याची प्रचंड दुरवस्था प्रत्येक वर्षी पावसाळ्यात होत असते. पुलाशेजारी संरक्षक कठडे नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघातही होत असतात. दरम्यान या पुलाशेजारील वडूथ बाजूने भरावाचे काम तातडीने करावे व सातारा-लोणंद रस्त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनावेळी ग्रामस्थांनी केली.
सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण शालीग्राम, त्याचे सहकारी, वाहतूक शाखेचे पोलीस, महसूल विभागाचे मंडलाधिकारी सागर कारंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोमनाथ चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन तातडीने काम सुरु करणार असल्याचे सांगून लेखी पत्रही दिले आहे. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |