दहिवडी: माण तालुक्याच्या पूर्वभागातील काही गावांमध्ये आज वळीव पावसाने हजेरी लावून या भागाला झोडपून काढले. पुळकोटी, पुळकोटीवाडी परिसरामध्ये वीजांच्या गर्जनेसह तुफान पाऊस पडला. या परिसरामध्ये गारांचा ही मोठ्या प्रमाणावर वर्षाव झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून माण तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाऊस पडणार याबाबतची शक्यता जाणकार व्यक्तींनी वर्तवली होती. त्यानुसार आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने माण तालुक्याच्या पूर्व भागात तुफान झोडपून काढले. या अवकाळी पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला, मात्र या पावसामुळे या भागातील नुकत्याच ऐन बहरात आलेल्या आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोसमातील आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मात्र या वळीव पावसामुळे सर्वत्र हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे. गेले काही दिवसांपासून माण तालुक्यातील तापमान मोठ्या प्रमाणवर वाढले होते परंतु आजच्या पावसामुळे काही काळासाठी का होईना वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील लोक सुखावले आहेत. दरम्यान वेधशाळेच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा तालुक्यात रविवारी व सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |