09:36pm | Nov 15, 2018 |
महाबळेश्वर : रांजणवाडी ता. महाबळेश्वर येथे एका इमारती शेजारी आठ फुट उंच संरक्षक भिंत्तीचे बांधकाम सुरू असताना मातीचा भराव कोसळुन बांधकाम करणारे दस्तगीर अब्दुल दिड्डी (वय-44) व त्यांचे जावई मुस्तफा दस्तगीर बल्लोरगी (वय-24) मुळ रा. मलगान ता. सिंदगी जि. विजापुर हे कर्नाटक राज्यातील दोन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने जागीच ठार झाले. मात्र या दुर्घटनेत एक कामगार सुदैवाने वाचला आहे.
कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्हयातील कामगार मोठया संख्येने महाबळेश्वर तालुक्यात खुदाईचे काम करतात. दुर्घनाग्रस्त कामगारांचे कुटूंब हे पांचगणीजवळ गोडवली येथे एकत्र राहण्यास आहेत. ते महाबळेश्वर येथे कामाच्या निमित्ताने येत असतात. शशी नावाचा ठेकेदार या कामगरांना बांधकामावर लावतो. राजंणवाडी येथील बांधकामावर शशी यांनीच कामगार पुरविले होते. दरम्यान रांजणवाडी ता. महाबळेश्वर येथे एका घराशेजारी संरक्षण भिंत्तीचे काम चार दिवसांपासुन सुरू आहे. दरम्यान आज सकाळी सात ते आठ फुट खोल मातीचे खोदकाम केल्यानंतर तेथे लोखंडी सळया जोडण्याचे काम सुरू होते. दुपारी कामावर असेलल्या तीन कामगारांनी जेवण केले व पुन्हा कामाला सुरूवात केली पाच ते दहा मिनीटांनी आठ फुट उंच मातीचा ढिगारा अचानक कामगारांच्या अंगावर कोसळला. यामध्ये दस्तगीर अब्दुल दिड्डी व मुस्तफा दस्तगीर बल्लोरगी हे सासरे व जावई मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. एक कामगार मात्र सुदैवाने वाचला. वाचलेल्या कामगारांने दोन कामगारांना ढिगाऱ्याखालुन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दोघांना बाहेर काढण्यास विलंब झाल्याने आतमध्ये गुदमरून त्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी दोघांनाही ढिगाऱ्याखालुन बाहेर काढून तातडीने येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोन्ही कामगार मृत झाल्याचे सांगितले. कामगारांचा मृत्यु झाल्याचे समजताच कामगारांचे नातेवाईक मोठया संख्येने रूग्णालयात दाखल झाले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. या दुर्घटनेची महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |