12:26am | Dec 08, 2019 |
सातारा : वनवणवा ही मानवनिर्मित आपत्ती असून ती रोखणे आपले कर्तव्य आहे . वनसंवर्धन होण्यासाठी जंगलांना लागणारे वणवे रोखायला स्थानिक पातळीवरून लोकसहभागाचे प्रयत्न होणं महत्वाचं असल्याचे मत उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांनी व्यक्त केले.
सातारा वन विभागाच्यावतीने वनवणवा नियंत्रणासाठी वनभवन येथे आयोजित कार्यशाळेत डॉ. हाडा बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानद वन्यजिव रक्षक सुनिल भोईटे उपस्थित होते. यावेळी फिरत्या पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, सातारा वनक्षेत्रपाल शितल राठोड, वाई वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांझुर्णे, परळीचे वनपाल योगेश गावित, वनपाल गजानन भोसले, वनपाल सुहास भोसले यांच्यासह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हाडा म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला समृध्द वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वनविभागाच्या प्रयत्नांना स्थानिकांची साथ आवश्यक आहे. ही साथ मिळविण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यापासून वन रक्षणाची जबाबदारी घ्यावी. स्थानिक पातळीवरच वणवा न लावण्याविषयी प्रबोधन झाले तर पुढं ही समस्या रौद्र रूप धारण करणार नाही.’
सुनिल भोईटे म्हणाले, ‘वणवा लावण्याविषयी अनेक गैरसमज समाजात वर्षानुवर्षे दृढ आहेत. हे समज बदलणं काळाची गरज आहे. यासाठी वणव्यामागचे प्रयोग आणि सत्यता याविषयी स्थानिक पातळीवर प्रबोधन होणं महत्वाचं आहे. वणवा लावल्यानं गवत चांगलं येतं हा चुकीचा समज आहे. वणव्यामुळे जमीन टणक बनुन ती कमी पिकाऊ होते, त्याबरोबरच आगीत होरपळून अनेक जीव आणि वनस्पती नामशेष होतात.’
कार्यशाळेचे सूत्रसंचालन सातारा वनक्षेत्रपाल शितल राठोड यांनी केले. यावेळी फिरत्या पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी मार्गदर्शन केले. वाई वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |