कराड : कृष्णा-कोयना नदींना आलेल्या पुरामुळे कराड शहरातील प्रीतीसंगम घाटासह पालिकेच्या पाईपलाईन, ड्रेनेज चेंबर, वारूंजी येथील जॅकवेल व रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 23.95 कोटी रूपये इतका अंदाजे खर्च येणार आहे. तो तात्काळ द्यावा, अशी मागणी कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगरविकास विभाग प्रशासनाकडे पत्राद्वारे सोमवारी केली.
कोयनेसह धोम, कण्हेर धरणातून पाणी सोडल्यामुळे रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी पासून कृष्णा व कोयना नद्यांची पाणीपातळी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुराचे पाणी कराड शहरातील इमारतींमध्ये घुसले. तर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ परिसर व प्रितीसंगम बागही पूर्णपणे पाण्यात गेली. तीन ते चार दिवस हा परिसर पाण्याखाली असल्यामुळे येथील खेळणी, पाईपलाईन, वीजेचे खांब, ड्रेनेज लाईन पाईप, सीसीटिव्ही कॅमेरे यांचे नुकसान झाले आहे. तर वारूंजी येथील जॅकवेलची भिंंतही कोसळली आहे. तसेच शाळांच्या इमारती, पिण्याच्या पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईन, अनेक रस्ते तसेच पूलाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीसाठी नगरविकास प्रशासनाकडून 23.95 कोटी रूपये देण्यात यावेत. संबंधित रक्कम तातडीने मंजूर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |