02:34am | Jul 20, 2019 |
कराड : मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये इतर विधानसभा मतदार संघातील नावांचा समावेश करून गोलमाल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कराड-दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देऊन सत्यता पडताळणी करूनच मतदार यादीत नावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दि. 20, 21, 27 व 28 जुलै 2019 या तारखा निश्चित केल्या आहेत. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार यादी विधानसभेसाठी गृहित धरण्यात येणार आहे.
मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रमामध्ये दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचा मतदार म्हणून समावेश करण्यात येणार आहे. तथापि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये वाळवा व पलुस कडेगांव विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये मतदार म्हणून समावेश असलेल्या परंतू कृष्णा हॉस्पिटल व कृष्णा शिक्षण संकुल तसेच कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये नोकरीस व शिक्षणासाठी आहेत, अशा विद्यार्थी व नागरिक मतदारांची नांवे संबंधित मतदार संघातून कमी करुन ती कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ठ करण्याकरीता काही राजकीय मंडळी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याचे समजले आहे. त्यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये इतर मतदार संघातील नांवे समाविष्ठ करत असताना संबंधित नागरिकाचे आधारकार्ड, रेशनकार्ड व रहिवाशी दाखला किती वर्षापुर्वीचे आहेत. याची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असून नमुना नं. 6, 7, 8 व 8 अ या नमुन्यातील कागदपत्रांची सत्यता व पडताळणी करण्यात यावी. तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. या प्रतिनिधी समवेत इतर मतदार संघातील नांवे समाविष्ठ करताना सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे.
तरी वरील सर्व बाबींचा विचार करता दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पुर्ण होणार्या नागरिकाचे नांव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे. परंतू, वर नमुद केलेले मतदार संघातील नावे कमी करुन ती कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये समावेश करण्यापुर्वी मतदाराचे विहित नमुन्यातील कागदपत्रांची पूर्ण तपासणी व खात्री करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, जयवंतराव जगताप, नाना पाटील, शंकरराव खबाले, सुनिल पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, वैभव थोरात, शिवाजीराव मोहिते, विद्याताई थोरवडे, मंगला गलांडे, नितेश जाधव, सचिन पाटील, शिवाजीराव जाधव, वैशाली वाघमारे, नितीन थोरात, इंद्रजीत चव्हाण, हणमंत भोपते, मनिषा तांबे, रणजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |