सातारा : मुलगा झाल्याच्या आनंदात एकाने बसस्थानकासमोरील पेढ्याच्या दुकानातून एक किलो सातारी कंदी पेढे आणले. स्वत:च्या मुलीला पेढा खायला दिला अन् तो पेढा खाताच मुलीला उलटी झाली. त्यावर पेढ्याचा वास घेतला असता तो कुबट वास येत असल्याने त्याचा जाब दुकानदारास विचारण्यास गेलो असता, दुकानदाराने शिवीगाळ करून दमदाटी केल्याची तक्रार सचिन परशुराम बनसोडे (रा. म्हसवे- वर्ये, ता. सातारा) यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, बनसोडे यांनी दि. 20 रोजी सव्वा किलो पेढे खरेदी केल्यानंतर त्याची पावती मागितली असता शेठ दुकानात नाहीत आणि आम्ही पावती देत नाही, असे सांगितले. घरी गेल्यानंतर मुलीला पेढा खाण्यास दिला. तो खाताच तिला उलटी झाली. पेढ्याचा संशय आल्याने त्याचा वास पाहिला असता तो कुबट येत होता. दुकानात जावून इतर पेढ्यांचा वास घेतला असता, त्यालाही वास येत होता. संबंधितांना वास घेण्यास सांगितले असता त्याही पेढ्यांना वास येत होता. त्यानंतर त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सातारकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या त्या दुकानांची तपासणी करावी, अशी मागणी बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |