05:14pm | Dec 07, 2019 |
सातारा : सातारा-लोणंद रस्त्यावरील वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील माऊली रेस्टॉरंट समोर लोणंद बाजूकडून येणार्या दुचाकीस्वारास संशय आल्याने त्याला अडवून त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एका मृत घोरपडीसह तब्बल 12 जिवंत घोरपडी सातारा वन परिक्षेत्र संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकास मिळून आल्या. संबंधितावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय 60 रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) हे लोणंद बाजूकडून वाठार स्टेशनकडे येत असताना सातारा येथील वन परिक्षेत्र संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वन संरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस कर्मचारी राजेश विरकर, सुहास पवार यांनी संशयावरुन श्रीरंग चव्हाण यांस येथील माऊली रेस्टॉरंटसमोर ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बांधून ठेवलेल्या अवस्थेमध्ये एका मृत घोरपडीसह तब्बल 12 जिवंत घोरपडी मिळून आल्या. यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे असलेल्या प्रशिक्षित श्वानाद्वारे घोरपडीच्या अधिवासाचा माग काढून त्याने घोरपडींची शिकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावेळी त्याच्याकडून एका दुचाकीसह प्रशिक्षित श्वान ताब्यात घेण्यात आले आहे. घोरपडींच्या शिकारप्रकरणी त्याच्यावर वाठार पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 42 व 43 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयिताने हे कृत्य मांस विक्री अथवा इतर कोणत्या कारणासाठी केले आहे, याबाबतचा तपास सुरु असून यामध्ये अजून काही संशयित आरोपी सहभागी आहेत काय, याबाबतचा तपास केला जात आहे. ही कारवाई सातारा वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वनविभागाच्या वतीने आवाहन :
घोरपड हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला अनुसुचि 1 मध्ये स्थान देऊन व्यापक संरक्षण दिलेले आहे. समाजातील अपप्रवृत्तीमुळे या वन्यप्राण्यंाचे अस्तित्वाला पर्यायाने निसर्गाच्या अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. घोरपडीच्या मांसाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातुनच सामान्य लोकांकडुन घोरपडीचे मांस विकत घेतले जाते. परंतु वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अन्वये शिकार करणारा बरोबरच मांस घेणारा देखील गुन्हेगार असुन याच कायदयाच्या कलम 51 अन्वये याला 3 वर्षे ते 7 वर्षापर्यंत कैद व रुपये दहा हजार रुपयेपर्यंत दंडाची तरतुद आहे. सदर गुन्हयांमध्ये प्रशिक्षीत शिकारी कुत्र्यामार्फत घोरपडीच्या ठिकाणाचा माग काढुन मग त्यांची शिकार केली गेल्याचे निदर्शनास आले आहे. तरी नागरिकांनी मांसाच्या लोभापायी अशा गंभीर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये व अशा प्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याची शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधुन अथवा 1926 या वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |