खंडाळा : शिरवळ ते भोर जाणाऱ्या रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे. बाळासो उर्फ बाळासाहेब आनंदराव महांगरे ( वय ४९ रा. सीतामाई वस्ती , विंग ता.खंडाळा ) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर इतर अपघातांमध्ये ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सीतामाई वस्ती ,विंग याठिकाणी राहणारे बाळासो उर्फ बाळासाहेब महांगरे हे शिरवळून घरी विंग बाजूकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी संबंधित दुचाकी हि शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलसमोर आली असता दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात कारने धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि बाळासो महांगरे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या बाळासो महांगरे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तत्पूर्वी बाळासो महांगरे यांना धडक देण्यापूर्वी संबंधित अज्ञात कारचालकाने विंग येथील एका खाजगी कंपनीमधील चार कामगार हे जेवण करून दुचाकीवरून निघाले असता त्यांनाही पाठीमागून धडक दिल्याने चार कामगार जखमी झाले.जखमी झालेल्या चार कामगारांची नावे समजू शकली नाहीत.
दरम्यान, बाळासो महांगरे यांचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान,कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. यावेळी गुरुवार दि. १ नोव्हेंबर हा अपघातवार ठरला असून शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पळशी विकास सोसायटीचे माजी चेअरमन माऊली उर्फ ज्ञानेश्वर महादेव भरगुडे हेही शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये गावडेवाडी फाट्यावर दुचाकीला धडकून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता पुणे येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मिरजेवाडी येथील समीर कासम पठाण हा दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याचप्रमाणे शिंदेवाडी फाट्यालगत कारने दिलेल्या धडकेत दोन वयोवृद्ध जखमी झाले असून संबंधितांची नावे समजू शकलेले नाही.तर मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान पारगाव खंडाळा रोडलगत झालेल्या एका अपघातामध्ये प्रमोद कांतीलाल टकसाळे ( वय ४९), गौरी मंदार पारखी ( वय २८),श्रावण मंदार पारखी (वय २), कांचन संतोष पोतदार ( वय ४०),चैताली संतोष पोतदार ( वय १९), इंदूताती कांतीलाल टकसाळे ( वय ६५) ,उषा विलास पारखी ( वय ६०, सर्व रा. सातारा ) हे जखमी झाल्याने शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |