05:45pm | Sep 25, 2019 |
सातारा : अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणार्या महाराष्ट्र फूडस् प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमेर सोहेबराव अली (वय 27) मूळ रा. फौजदार चर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कत्तलखान्यात कामाला होता. दरम्यान सोमेर याच्यावर अज्ञात संशयिताने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा मृतदेह चिलरमध्ये टाकला होता. आज पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली असून याबाबतचा अधिक तपास पो. नि. पोमन करीत आहेत.
‘त्या’ कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
फलटण तालुक्यातील कत्तलखान्यांमध्ये अवैधरित्या गोवंशाची कत्तल होत असल्याचे वेळोवेळी ‘सातारा टुडे’ने समोर आणून दिले आहे. मात्र फलटण शहर पोलिसांच्या गांधारी भूमिकेमुळे आजपर्यंत बीफ माफियांचे फावले आहे. तत्कालीन परिवेक्षाधीन पोलीस अधिकारी पवन बनसोड यांनी फलटण नगरपालिकेच्या मालकीच्या कत्तलखान्यावर छापा टाकून टनांमध्ये गोवंशाचे मांस जप्त केले होते. मात्र त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी या कत्तलाखान्यावर कारवाई केली नाही. 2016 साली राज्य शासनाने गो हत्त्या बंदी कायदा लागू केल्यानंतरही या कायद्याची फलटणमध्ये राजरोसपणे पायमल्ली होत असूनही फलटण पोलिसांना ही बाब दिसत असूनही त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. दरम्यान अलगुडवाडी येथील महाराष्ट्र फूडस् प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या कत्तलखान्यात परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्यामुळे फलटण तालुक्यातील कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |