सातारा : अर्कशाळेत कार्यरत असलेले डॉ.सुधीर प्रतापराव धुमाळ (वय ६०, रा.गेंडामाळ, सातारा) यांना अनोळखीने मोबाईलद्वारे फोन करुन 'एटीएम कार्डची माहिती पाठवली असल्याचे सांगून त्यावरुन ओटीपी क्रमांकाद्वारे' तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक महिती अशी, ही घटना दि. ३ रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने डॉ. सुधीर धुमाळ यांना फोन केला. 'आपको जो कार्ड भेजा है उसके बारे में कन्फर्म करना हैं. आपके मोबाईल पर एक ओटीपी नंबर आयेगा, वो हमे बताओ. बाद में आपका कार्ड कन्फर्म हो जाएगा,' असा अनोळखी व्यक्तीने फोनवरुन संवाद साधला. हिंदीमधून हा संवाद झाल्यानंतर डॉक्टरना मोबाईलवर मेसेज आला. त्या मेसेजवर ओटीपी क्रमांक होता. डॉक्टरनी तो ओटीपी क्रमांक अनोळखी फोन केलेल्या व्यक्तीला सांगितला.
एकूण तीनवेळा आलेला ओटीपी क्रमांक त्या अनोळखी व्यक्तीला सांगितल्यानंतर काही मिनिटांमध्ये डॉ.धुमाळ यांच्या मोबाईलवर त्यांच्या स्टेट बँकमधून एकूण ६ लाख रुपये काढल्याचे तीन मेसेज आले. आपण पैसे काढले नसतानाही ६ लाख रुपयांचे ट्रांन्झेक्शन झाल्याचे मेसेज वाचून डॉक्टरना घाम फुटला. तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक कोणीही मागितल्यास तो देवू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |