12:36am | Nov 09, 2019 |
सातारा : सातारा- पुणे महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत जागृत सातारकरांनी सोशल मिडियावरून आवाज उठवल्यानंतर श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी महामार्ग दुरुस्त न झाल्यास एक डिसेंबरपासून टोलवसुली करू देणार नाही असा तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दहा दिवसांमध्ये महामार्ग दुरुस्त करा असा आनेवाडी टोल व्यवस्थापनाला अल्टिमेटम दिल्यामुळे या दोन्ही राजांमध्ये पुन्हा एकदा सुंदोपसंदी ? पाहायला मिळत आहे. दोघांची वेगवेगळी वक्तव्य पाहून सातारकर मात्र संभ्रमात पडले आहेत. मात्र असे असताना महामार्ग प्राधिकरण कोणाचा अल्टिमेटम गांभीर्याने घेते हे आता पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
सातारा - पुणे महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्डयांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. चार महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाची अक्षरशः वाट लागली असून वारंवार मागणी करूनही महाराष्ट्र प्राधिकरण मात्र याकडे अजिबात लक्ष देत नाही. सातारा पुणे महामार्गावर आनेवाडी आणि खेड शिवापूर येथे असलेल्या टोलनाक्यावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. उलट या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बिहारी संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीने वाहनचालकांना ट्रिटमेंट मिळत होती. आनेवाडी टोल नाका आपल्यालाच मिळवावा, यासाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिहराजे भोसले हे दोन्ही गट यापूर्वी आक्रमक झाल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यावरूनच सुरूची राडा प्रकरण घडवण्यात आले. कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांपासून लपून छपून सातारा जिल्हा हा सोडण्याची वेळ आली.
यापूर्वी अनेक वाहतूक संघटनांनी आनेवाडी आणि खेड-शिवापूर टोल नाक्यावर कोणतीही सुविधा नाही, सातारा -पुणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे अशी मागणी करत आंदोलनाची भाषा केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी कोणतेच आंदोलन न केल्यामुळे गेले काही महिने रस्ते विकास महामंडळ रस्त्यांच्या अवस्थेकडे मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून सातारकरांसह जिल्ह्यातील काही नागरिकांनी कोणाचेही भीडभाड न ठेवता वज्रमूठ आवळत आनेवाडी आणि खेड शिवापुर टोलनाक्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत रस्ते विकास महामंडळाचा कारभारही चव्हाट्यावर आणत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यामार्फत देशातील विविध मंत्र्यांना निवेदने देऊन रस्त्यांचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत टोल भरणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती.
टोल विरोधात सातारकर जनतेसह जिल्ह्यातील जनता आक्रमक होत असल्याचे पाहताच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १० दिवसात महामार्ग दुरुस्त करा असा अल्टिमेटम दिला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी जलमंदिर येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उदयनराजे भोसले यांनी महामार्ग दुरुस्त न झाल्यास एक डिसेंबरपासून टोलवसुली करू देणार नाही, असा सज्जड इशारा दिला आहे. मुळात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १० दिवसाचा तर उदयनराजे भोसले यांनी तब्बल २६ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या अल्टीमधील फरक पहाता दोन्ही राजांमध्ये असलेली सुंदोपसुंदी स्पष्ट होत आहे. दोघांच्यातील वक्तव्यातील दुरवस्था पाहता दोघांच्यामध्येही मोठा विरोधभास असल्याचे दिसून येते.
सहा महिन्यात नगराध्यक्षांचे दोन पाहणी दौरे
सातारा शहरातील रस्त्यांची महामार्गापेक्षाही बिकट अवस्था झाली आहे. शहरामध्ये गेल्या वर्षापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण अन्य रस्त्यांवर पडत आहे. साताऱ्यातील रस्ताप्रश्नी सातारकर अधिकदा आक्रमक झाल्याचे पाहून आधी सहा महिन्यापूर्वी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पत्रकारांना सोबत घेऊन शहरांमध्ये ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना लगतच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या सूचनांवर कोणतीही कारवाई झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा छायाचित्रकारांना बरोबर घेऊन ग्रेड सेपटरच्या कामाची पुन्हा एकदा पाहणी केली. सहा महिन्यांमध्ये नगराध्यक्षांनी केवळ पाहणी दौऱ्याच केले, या दौर्याचे फलित मात्र सातारकरांना काहीच मिळाले नाही.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |