05:42pm | Dec 09, 2019 |
सातारा : थोरल्या भावासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून धाकट्या भावाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शाहूपुरीतील शिवाजीनगर या परिसरात सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास भररस्त्यात घडली असून, या घटनेने परिसर हादरला आहे. संतोष जयसिंग शिंदे (वय ३६, रा. शाहूपुरी, शिवाजीनगर, सातारा) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत संतोष शिंदे आणि त्यांचा थोरला भाऊ गणपत जयसिंग शिंदे (वय ४६) यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद होत होते.
हा वाद न्यायालयातही सुरू आहे. याची सोमवार, दि. ९ रोजी तारीखही होती. दरम्यान, सोमवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतोष शिंदे यांनी संतापाच्या भरात स्वत:जवळ असलेल्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने शाहूपुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली. संतोष शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.
पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतोष शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. संतोष शिंदे हे मुंबई येथे रियल इस्टेटचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना होता की नाही, हे अद्याप समोर आले नसून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |