01:50am | Jun 05, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील लाचखोरीला आळा बसवण्यासाठी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभाग सक्षम असून तक्रारदारांनी नि:संकोचपणे पुढे यावे व तक्रार द्यावी. येत्या काही कालावधीत लाचखोरांना कोर्टात जास्तीत जास्त व कडक शिक्षा होईल यासाठी अमुलाग्र बदल होत असल्याचा विश्वास पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी व्यक्त केला. दरम्यान, शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनीही लाचेची मागणी केल्यास त्यांच्या तक्रारीही तक्रारदारांनी निर्भयपणे द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
सातारा येथील विश्रामगृहावर आल्यानंतर त्या प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी एसीबी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के उपस्थित होते.
पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण पुढे म्हणाल्या, लाचखोरी कमीत कमी व्हावी, हा शासनाचा व लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा उद्देश आहेे. लाचखोरीच्या केसेस या तक्रारदार असल्याशिवाय करणे शक्य नाही. प्रत्येक सर्वसामान्यांना तसेच कॉन्ट्रक्टर यांना शासकीय कार्यालयात कोणत्या कोणत्या कामात जावे लागत असते. सर्वच ठिकाणी वेळेत व पारदर्शकपणे कामे होत आहेत अशी परिस्थिती नाही. यामुळे मूळ कामासाठी जर लाचेची मागणी झाली तर संबंधितांनी 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एसीबी विभागाशी संपर्क साधून नि:संकोचपणे तक्रार करावी. दुर्देवाने मात्र लोकांना या विभागाबाबत माहिती नसल्याने ते पैसे देवून आपली कामे करुन घेतात. यामुळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांनी शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास त्यांनी एसीबी विभागात तक्रार करावी.
सुषमा चव्हाण पुढे म्हणाल्या, लाचखोरीप्रकरणात लोकसेवकाला शिक्षाच लागेल यासाठी सध्या अमुलाग्र बदल होत आहे. एसीबी विभागाच्या वरिष्ठ पातळीवरुनच याचा अभ्यास होत आहे. विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सेमिनार घेतले जात आहे. एखाद्या प्रकरणात संशयित आरोपी सुटला तर तो का सुटला? कशामुळे सुटला? कोणते आधार वापरले? याचा प्रामुख्याने अभ्यास केला जात आहेे. भविष्यात अशा केसेसमध्ये त्रुटी राहणार नाहीत यासाठी एसीबी विभाग खबरदारी घेत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |