03:07am | Jan 21, 2019 |
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकर्यांनी काढलेल्या अर्धनग्न मोर्चामधील शेतकर्यांना, महिलांसह मानखुर्द याठिकाणी पोलीसांनी आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कारण देत ताब्यात घेत चेंबुर याठिकाणी रवाना केले. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांपैकी एका आंदोलकाने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधत शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी केली असता पालकमंत्र्यांकडून शेतकर्यांची खरडपट्टी काढण्यात आल्याने शेतकर्यांनी घटनास्थळी या घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी पालकमंत्री व शेतकर्यांची मोबाईलद्वारे झालेल्या चर्चेची ऑडियो क्लिप दिवसभर विविध सोशल माध्यमातून फिरत होती. दरम्यान, शेतकर्यांना मानखुर्द याठिकाणी दिवसभर थांबवण्यात आल्याने शेतकरी बांधवांनी घटनास्थळीच ठिय्या मांडत सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान, रात्री उशिरा प्रशासनाच्या विनंतीवरुन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर शेतकरी सोमवार दि.21 रोजी मंत्रालयामध्ये चर्चा करणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीने दिली.
यावेळी खंडाळा तालुका माथाडी आणि जनरल कामगार युनियनचेवतीने व शिरवळ मुस्लिम समाजाच्यावतीने अध्यक्ष अमीर काझी, सदस्य मतीन शेख, निसार पठाण यांनी आंदोलक शेतकर्यांना पाठिंबा दिला. यावेळी शेतकरी कृती समितीचे प्रमोद जाधव, युवराज ढमाळ, शेतकरी बांधव उपस्थित होते.
मॅरेथॉनला चार तास सवलत, शेतकर्यांना उन्हात बसण्याची शिक्षा
मंत्रालयाकडे विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा वरिष्ठांच्या आदेशानुसार मानखुर्द याठिकाणी पोलीसांनी अडविल्यानंतर पोलीस व आंदोलक शेतकर्यांची शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शेतकरी आम्हाला फुटपाथाची पाच फुट जागा द्या, आम्ही त्यावरुन जाऊ, अशी मागणी करत असताना पोलीस प्रशासनाकडून मात्र ही मागणी पूर्ण न करताच वाहनातून सोडण्यात येईल, असे सांगितले गेल्याने शेतकर्यांनी मानखुर्द याठिकाणी ठिय्या मांडत मॅरेथॉनला चार तास व सर्वसुविधा शासन पुरवत असताना जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र दिवसभर भर उन्हात आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |