सातारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून आज शहरातून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने झांजपथक, लेझीमच्या तालावर काढण्यात आलेल्या समता दिंडीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू बोर्डींग, पोवई नाका, सातारा येथून सकाळी 8.30 वाजता समता दिंडीला प्रारंभ झाला. या समता दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी उत्कृष्टरित्या संचलन केले. समता दिंडीमध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग तसेच विविध विकास महामंडळांच्या योजनांची चित्ररुपाने माहिती देणाऱ्या चित्ररथांचा समावेश होता. या चित्ररथांद्वारे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजना व बिज भांडवल योजनांचा जनजागृती करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शाहू बोर्डींग येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासह विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध शासकीय कार्यालयांचे तसेच विविध मागासवर्गीय विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |