02:20am | Dec 09, 2019 |
सातारा : माथाडी नेते तथा माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभेत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. लायकी नसलेला माणूस केवळ सातारच्या दोन महाराजांमुळे निवडून आला, तर पराभवामुळे गेल्या दीड दशकाच्या राजकारणाला ब्रेक लागल्यामुळे माजी आ. शशिकांत शिंदे आता पुन्हा संघर्षाच्या मूडमध्ये आलेले आहेत. कुडाळ, ता. जावली येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे.
पक्षापुढे भाऊ, मित्र, सहकार्यांची तमा बाळगणार नाही, देर आये लेकीन दुरुस्त आये असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी कुडाळ येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शड्डू ठोकला. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत जावली, सातारा, महाबळेश्वर हा मतदारसंघ विसर्जित झाला. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या आदेशाने हा मतदारसंघ सोडावा लागला. पवारसाहेबांच्या बेरजेच्या राजकारणात माजीमंत्री, खासदार राहिलेल्या शालिनीताई पाटलांसारख्या तुल्यबळ विरोधकाला लोळविण्याचे काम शशिकांत शिंदेंनी केले. 2009, 2014 या दोन्ही निवडणुका शशिकांत शिंदेंनी एकहाती जिंकल्या. परंतू 2019 च्या निवडणुकीत सातारच्या दोन्ही राजांनी फडणवीसांच्या नादाला लागून भाजपशी घरोबा केला. सरड्याप्रमाणे रंग बदलण्यात माहीर असलेला खटावच्या पिस्तुल्याने संधी साधत भाजपातून सेनेत उडी मारली. सातारच्या त्रिशंकू भागात दोन्ही राजांनी जोर लावल्यामुळे शशिकांत शिंदेंचा अनपेक्षित पराभव झाला. एरव्ही सगळ्यांना सामावून घेणार्या शशिकांत शिंदेंचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दीपक पवारांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतू भाजपच्या शिवेंद्रराजेंविरोधात दीपक पवारांचा पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने शशिकांत शिंदेंनी जावली तालुक्यात भिरकीट सुरु केली आहे. 1999 साली ज्या ताकदीने सदाशिव सपकाळांना आस्मान दाखवले, त्याच ताकदीने आता जावली काबीज करायची, असा मानस शशिकांत शिंदेंनी प्रचारसभांच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. विरोधकांकडून माझ्या भूमिकेबाबत शंकेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात कोणी काही करत असेल, तर त्याच्या विरोधात मला उभे रहावेच लागेल. शरद पवारांनी माझ्या राजकीय वाटचालीसाठी योग्य ताकद देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे माझा नेता माझे योग्य पुनर्वसन करणारच, त्यासाठी जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. उपर्यांना हद्दपार करावे. आता हा शशिकांत शिंदेच जावलीचा वाघ आहे, असे आव्हान ते करीत आहेत. यापुढील राजकारणात भाऊ, मित्र, सहकार्याची तमा बाळगणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबतची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आता सगळ्यांचे हिशोब चुकते करण्याची वेळ आलेली आहे. आगामी काळात जावली तालुक्यात भाजपा नावालाही शिल्लक ठेवणार नाही, या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील शेतकर्यांचा, कामगारांचा विषय हातात घेवून तालुक्यातील शेतकर्यांना न्याय मिळवून देणार आहे, अशी भूमिका शशिकांत शिंदेंनी घेतलेली आहे. एकूणच कुडाळ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री शशिकांत शिंदेंनी सातारच्या दोन्ही राजांसह कोरेगावच्या आमदाराविरोधात आपली ठोस भूमिका जाहीर केल्यामुळे येणार्या दिवसांमध्ये शशिकांत शिंदे कोणाकोणाला आस्मान दाखवणार, याबाबतची उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |