03:44pm | Oct 06, 2019 |
मुंबई : दरवर्षी भारतात 2.4 लाख मुलांना जन्मजात हृदयरोग असतो आणि त्यातील एक पंचमांश मुलांना त्यांच्या पहिल्या वर्षातच खास उपचारांची गरज भासते. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने, नारायण हेल्थच्या एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने समाज सेवा अंतर्गत, सरकारच्या विविध योजनांअंतर्गत दरमहा 200 गरजू हृदयविकार बालरूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे जाहीर केले. नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी यांनी जागतिक हृदय दिन 2019 च्या निमित्ताने लहान रूग्णांना भेट देऊन एनएच- एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, मुंबई येथील काही ठरावीक बाल रुग्ण तज्ञ डॉक्टरांना संबोधित केले.
पिडीत एक हजार लहान मुलांवर हृदयविकार शस्त्रक्रिया करणाऱ्या एनएच- एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने भारतातील बालरोगशास्त्र ( पीडियाट्रिक केयर ) क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित केली असून हॉस्पिटलद्वारे सुपर- स्पेशॅलिस्ट केयर आणि कमीत कमी छेद केल्या जाणाऱ्या ट्रान्सकॅथेटर तंत्रासह तंत्रज्ञानविषयक नव्या घडामोडी आणि दर्जेदार सर्जिकल तसेच इंटरव्हेंशन्शल उपचार जन्मजात हृदयरोग ( कॉग्निटल हार्ट डिफेक्ट्स ) (सीएचडी) असणाऱ्या मुलांसाठी वापरले जातात.
नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी म्हणाले, ‘आयुषमान भारतमुळे भारतातील हृदयरोग शस्त्रक्रिया विशेषतः लहान मुलांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढेल. यशस्विनी या लघु आरोग्य विमा कंपनीने 15 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरही तिचा प्रभाव प्रामुख्याने दक्षिण आणि पश्चिम भारतात राहिला, मात्र आयुषमान भारतमुळे उत्तर, केंद्रीय आणि पूर्व भारतातील कुटुंबांनाही फायदा होईल. नारायण हेल्तच्या बेंगळुरू येथील हॉस्पिटलद्वारे 76 देशांतील मुलांवर 12- 16 हृदयरोग शस्त्रक्रिया केल्या जातात आणि हृदयरोग शस्त्रक्रियांचा खर्च कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा शस्त्रक्रियांची संख्या वाढवणे. नारायण हेल्थमध्ये आम्ही आरोग्यसेवा तसेच हृदयरोगसेवांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेवर निदान, उपचार व काळजीसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ खुले करून देण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.’
गेल्या एका वर्षभरात बालरोग हदयतज्ज्ञांच्या टीमने ग्रामीण मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे 1400 मुलांची तपासणी केली. यामध्ये 33 टक्के मुलांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचे दिसून आले, तर 14.3 टक्के रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली.
नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सोनू उदानी म्हणाल्या, ‘हॉस्पिटलने महाराष्ट्र राज्यात हृदयरोग शिबिरांचे आयोजन केले होते. दुर्गम भागातील खेड्यांपर्यंत हृदयरोगाची मोफत शिबिरे पोहोचवण्यासाठी हॉस्पिटलने वेगवेगळ्या राज्य सरकारांबरोबर काम केले असून त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोव्याचा समावेश आहे.’
नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार बालरोगशास्त्र हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रतिम सेन म्हणाले, ‘कॉग्निनेटल हार्ट डिसीझचे ( सीएचडी ) ( जन्मजात हृदयरोग ) जन्मजात आजारांमधील प्रमाण 28 टक्के आहे. दर 1000 जन्मामागे 8- 12 सीएचडीच्या केसेस दिसून येतात. भारतात दर वर्षी अंदाजे 2,40,00 मुले सीएचडीसह जन्मतात व त्यापैकी एक पंचमांश मुलांना त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात वेळेवर उपचार करण्याची गरज असते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |