01:22am | Aug 12, 2019 |
वाई : महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या कचऱ्यामुळे नदीकाठी दुर्गंधी पसरली होती. शहरात ही ठिकठिकाणी कचरा व घाण साचली होती. अस्वच्छतेमुळे शहरात रोगराई पसरू नये यासाठी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन रविवारी वेगवेगळी दहा पथके तयार करून एकाच वेळी सर्व प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
वाई शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेमुळे व धोम धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडणेत आलेने शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शहरातील कृष्णानदीपात्रामधील पुराचे पाणी ओसरल्यानंतर नदीप्रवाहातील पाण्याबरोबर घाण व कचरा मोठया प्रमाणात वाहून आलेला होता नगरपरिषदेच्या आरोग्य विभगामार्फत दैनंदिन स्वच्छता चालूच होती तथापि एकाच वेळी सर्व शहर स्वच्छ झालेस रोगराई परसण्यास अटकाव होऊ शकतो त्यामुळे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम हाती घेणेत आली होती अशी माहिती पोळ यांनी दिली. या मोहिमेत शहरातील स्वच्छता व साफसफाई करणेसाठी एकूण १०पथके तयार करुन प्रत्येकी पथकात १६ कर्मचारी असे एकूण १६० कर्मचारी यांचेमार्फत व १० घंटागाडया,४ ट्रक्टर या माध्यमातूनशहरात स्वच्छता करणेत आल्याचे त्यानी सांगितले.
या मोहिमेची सुरुवात श्री महागणपती मंदिरापासून करणेत आली होती. शहरातील नावेची वाडी, गंगापूरी, मधली आळी गणपती आळी, भाजीमंडई, किसनवीर चौक, साठेर्धमशाळा परिसर धुंडीविनायक परिसर , ब्राम्हणशाही परिसर, रामडोह आळी परिसर, यंगरविवारचौक परिसर, चावडीचौक, कल्पतरु मंगल कार्यालय परिसर, पेठकर कॉलनी, भुई गल्ली, रांगोळी आळी परिसर, चर्मकार वसाहत परिसर, शिदे हायस्कूल परिसर, वाई परटाचा पार परिसर, घोरपडे हॉस्पीटल परिसर, कळवत आळी परिसर, रविवारपेठ स्मशानभूमी परिसर, फुलेनगर परिसर, जुम्मा मशिद परिसर, सुर्यवंशी चौक परिसर, अंबाबाई मंदीर परिसर, हनुमान मंदीर परिसर सिध्दनाथवाडी, दत्तनगर, एस.टी.स्टैंड परिसर, सायली कट्टा परिसर गितांजली हॉस्पीटल परिसर, शाळा क्र. १ नंबर परिसर, ज्योतीबा मंदीर परिसर, वाई पोलीस स्टेशन, कचेरी, परशुराम मंदीर परिसर इत्यादी भागांची स्वच्छता करणेत आली.
या मोहिमेमध्ये नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, सुनिता चक्के, महेंद्र धनवे, सतिश वैराट, सुमय्या इनामदार, सीमा नायकवडी, संग्राम पवार, स्मिता हगीर, भारत खामकर, किशोर बागुल, वासंती ढेकाणे, रुपाली वनारसे, चरण गायकवाड, शितल शिंदे, प्रदीप चोरगे, विकास काटेकर, रेश्मा जायगुडे, राजेश गुरव, प्रियांका डोंगरे, आरती कांबळे, दिपक ओसवाल, अॅड. श्रीकांत चव्हाण, या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये कृष्णा नदी सेवा कार्याचे काशिनाथ शेलार, प्रा. नितीन कदम, अमित सोहनी, चंद्रशेखर वनारसे, कुमार पवार, विवेक चिंचकर, सुधीर क्षीरसागर काका डाळवाले, भवरलाल ओसवाल, विजय ढेकाणे, किरण खामकर, यांनी घेणेत आला होता. प्रशासन अधिकारी वाळवेकर स्वच्छता मोहिमे सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |