03:14am | Jul 24, 2018 |
सातारा : सध्या मराठा क्रांती मोर्चामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. परळी, जि. बीड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी कंबर कसली असतानाच आज सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर ‘जिल्हा बंद’चे आवाहन केले आहे. मात्र फलटण तसेच इतर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (उद्या) बंदचे आवाहन केल्यामुळे जिल्ह्यात व्यावसायिक, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
आज आषाढी एकादशीच्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या विठुमाऊलीची पूजा करण्यापासून रोखले होते. तसेच मराठा समाजाला आरक्षणापासून जाणुनबुजून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करीत औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी आज मोर्चा काढला होता. या मोर्चातील काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारुन आपले जीवन संपवले. शासनाच्या निषेधार्थ व काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूमुळे राज्यभरात प्रक्षोभाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. त्याबाबतचे मॅसेज व्हॉटसऍपसह सोशल मिडियावर फिरु लागले होते. याबाबत सातारा येथील समितीने याबाबत उद्या सातारा येथील कल्याण रिसॉर्ट येथे बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानुसार बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ च्या दिवशी सातारा बंद राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, फलटण येथील मराठा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी बेंदूर सण असल्यामुळे तसेच गुरुवारपासून फलटणमध्ये ठिय्या आंदोलनाचे आयोजन केल्यामुळे उद्या दि. 24 (मंगळवार) ‘फलटण बंद’चे आवाहन केल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. तसेच जावली तालुकाही बुधवारीच बंद असणार आहे, अशी माहिती व्यसनमुक्त संघाचे कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिलेली आहे.
आज आषाढी एकादशी संपल्यानंतर पंढरपुरातील वारकरी व भाविकांना सातारा जिल्ह्यातून उद्या मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यांची गैरसोय होवू नये म्हणून सातारा येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने उद्याचा बंद परवावर ढकललेला आहे. त्यामुळे ‘बंद’बाबत समन्वयाने मार्ग काढावा व सातारा जिल्ह्यातील बंद हा एकाच दिवशी घेण्यात यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी सोशल मिडियाद्वारे केलेले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |