03:04pm | Jul 17, 2019 |
सातारा : सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्याय अर्थात बहुचर्चित मडिकल कॉलेज सुरु होण्याचा प्रश्न आता सुटला आहे. मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करा, त्यासाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मीती तातडीने करा, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक महिन्यापुर्वी केलेल्या मागणीची पुर्तता नुकतीच झाली असून सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात म्हणजेच तीन वर्षांसाठी मडिकल कॉलेज सुरु करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच काढला आहे. अधिष्ठाता यासह प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आदी पदनिर्मीती आणि पदनिश्चितीही करण्यात आली असून येत्या काही महिन्यात सातार्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार हे निश्चित.
सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. मात्र पाटबंधारे विभागाची जागा हस्तांतरण, इमारत बांधकाम यामुळे सातार्यातील बहुचर्चीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजतं घोंगडं कायमच होते. इमारत कधी बांधणार आणि मेडीकल कॉलेज प्रत्यक्षात कधी सुरु होणार? याबाबत सांशकता निर्माण झाली होती. असे असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अभ्यासपुर्ण मागणी करुन मेडीकल कॉलेज सुरु होण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री कराड दौर्यावर आले असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची आवर्जुन भेट घेवून मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करता येवू शकते. ही जागाही शासनाचीच आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा आणि यासाठी आवश्यक पदनिर्मीती करुन पदे निश्चित करावीत. जेणेकरुन मेडिकल कॉलेजचे प्रथम आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रम सुरु होतील आणि जिल्ह्यातील होतकरु मुलांचा वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मोठा अडसर दूर होईल. असे रास्त मुद्दे मांडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करण्याची आणि त्यासाठीची पदनिर्मीती आणि पदनिश्चिती करण्याची आग्रही मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच अधिवेशन काळातही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार कालच (दि. 15 जुलै 2019) रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सातारा वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीत सुरु करण्याचा अध्यादेश काढला आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या किमान निकषांनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालाकरीता किमान 300 रुग्णखाटांचे रुग्णालय आवश्यक सोईसुविधांसह उपलब्ध असणे गरजेचे असते. यास अनुसरुण सातारा येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या इमारतील बहुचर्चित मेडिकल कॉलेज सुरु होणार आहे. या निर्णयासह शासनाने अधिष्ठाता (डीन), प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, तज्ञ डॉक्टर्स आदी पदनिश्चिती आणि पदनिर्मीतीही केली असून याशिवाय इतर कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयातील स्टाफ तात्पुरता वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून या निर्णयामुळे सातार्यात प्रत्यक्षात शासनाचे मेडिकल कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबुन राहणार्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय थांबणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
कराड येथे प्रत्यक्ष भेट घेवून तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करण्याची आणि त्यासाठी पदनिर्मीती करण्याची मागणी मी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देवून मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात प्रक्रीया सुरु झाली असून लवकरच प्रवेश प्रक्रीया, प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमही सुरु होईल. हे पहिले पाऊल असून मुख्यमत्र्यांनी सातारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने दिली आहे.
डॉ. मुरलीधर तांबे होणार पहिले डिन
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार शासनाने मेडिकल कॉलेज सुरु करण्यास मान्यता दिली असून त्यांच्या मागणीनुसार पदनिर्मीती आणि पदनिश्चितीही केली आहे. सातार्यात सुरु होणार्या मेडिकल कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणजेच अधिष्ठाता (डिन) होण्याचा मान डॉ. मुरलीधर तांबे यांना मिळाला असून त्यांची यापदी नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांच्यासह प्राध्यापक, सहप्राध्यापक, तज्ञ डॉक्टर्स आदी पदांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |