परळी : ठोसेघर- चाळकेवाडी मार्गावर सज्जनगड फाटयाच्या पुढे असलेल्या वळणावर रस्त्याचा भराव खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
परळी ठोसेघर परिसरात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. येथील ओढे- नाले दुथडी भरून वाहत आहेत. ठोसेघर मार्गावरही डोंगर दऱ्यातून वाहत येणारे पाणी रस्त्यावरून वाहून रस्ता खचला आहे या रस्त्यावरच काही भाग सकाळीच पडला होता. मात्र वाहनधारक लक्ष देत नव्हते. सायंकाळी उशिरा अंधार पडण्याच्या वेळेस म्हणजे ६.३० दरम्यान हा रस्त्याचा भाग खाली कोसळला होता. यावेळी वाहनधारकांनी तत्काळ वाहने थांबवून या मार्गावर दगड लावले. जेणेकरून येणाऱ्या वाहनांना खचलेला रस्ता समजावा.
रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर असाच राहिला तर हा रस्ता खचून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
या मार्गावर पावसाळ्यातील तीन महिने रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने नाले खुदाई करणे गरजेचे होते. जेणेकरून पाण्याचा प्रवाह कमीत कमी रस्त्यावरून वाहत खाली जाईल. मात्र यावर्षी नाले खुदाई न केल्याने डोंगरावरून येणारे पाणी, दगड रस्त्यावरच वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |