वडूज : शहरातील अनेक युवकांचे फेसबुक अकाऊंट आज अज्ञाताने हॅक करून त्यावरून अनेकांना अश्लिल मेसेज तसेच शिवीगाळ करण्याबरोबरच दमदाटी केली आहे. या प्रकाराने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकाराचा सायबर क्राईमने तातडीने छडा लावण्याची मागणी युवकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या चार दिवसांपासून सोशल मिडीयातील फेसबुक या साईटवर येथील काही युवकांचे पर्सनल अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. त्या अकाऊंटवरून शहरातील अनेक युवकांना अश्लिल मेसेज पाठविण्याबरोबरच शिवीगाळ व दमदाटी देखील करण्यात आली आहे. या प्रकाराने गेल्या चार दिवसांपासून शहरात मोठी खळबळ माजली आहे. ज्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून दुसर्यांना असे मेसेज पाठविण्यात आले आहेत, त्यांच्यांत अगोदर चांगलीच तू ..तू ..मै मैं झाली आहे. जवळच्याच मित्राकडून फेसबुकच्या पर्सनल अकाऊंटवरून पब्लीक पोस्टमध्ये अशाप्रकारे अश्लिल मेसेज, शिवीगाळ, दमदाटीचे अशा कमेंट आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
या सगळ्या प्रकाराने शहरातील युवकांमध्ये एकमेकांत वादाचे प्रसंगही निर्माण झाले मात्र फेसबुक अकाऊंट हॅक करून असे मेसेज एकमेकांना पाठविल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र युवकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर अनेक जण आपलेही फेसबुक अकाऊंट हॅक केले नाही ना याची खातरजमा करीत होते. याबाबत युवकांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी देऊन या प्रकाराचा छडा लावण्याची मागणी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |