11:21pm | Apr 01, 2020 |
बुध : कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. यामध्ये विशेषतः हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांवर उपसमारीची वेळ आली आहे. आशा परिस्थितीत अनेकजण आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडून देत आहे परंतु सातारा येथे बांधकाम व्यवसायात अग्रेसर म्हणून काम करणाऱ्या बालाजी कन्स्ट्रक्शनने आपल्या ६० कामगारांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. शत्रू आपल्यापेक्षा बलवान आहे त्यावेळी त्याच्याशी आपण गनिमी काव्याने लढले पाहिजे अशी आपणास छ. शिवाजी महाराजांनी शिकवण दिली आहे. कोरोना हा आपला शत्रू आहे परंतु तो अदृष्य आहे अशा परिस्थितीत आपण दोन हात करण्यापेक्षा त्याच्याशी गनिमी काव्याने लढून म्हणजेच घरामध्ये राहून याला हरवू शकतो, असे मत यावेळी बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा रमेश उबाळे यांनी व्यक्त केले.
गेली अनेकवर्षे बांधकाम व्यवसायात मंदी आहे. यामुळे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. यातच भर म्हणून कोरोना विषा णूने संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडविल्याने आपला देश पूर्ण लॉकडाऊन झाला आहे. यामुळे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने यामध्ये दररोज कमवू त्यावेळी चूल पेटणाऱ्या म्हणजेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बांधकाम व्यवसायामध्ये आधीच मंदी असल्याने हा आधीच अडचणीत आहे. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने अनेक व्यवसायिक आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडून देत असतानाच बालाजी कन्स्ट्रक्शन मात्र याला अपवाद ठरली आहे. नुकतेच बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा रमेश उबाळे व त्यांचे व्यवसाय बंधू मोहसीन बागवान स्टार उद्दोग सातारा यांनी आपल्या नेहमीच्या मजूर, कामगारांना अन्नधान्य वाटप व इतर मदत केली आहे.
बालाजी कन्स्ट्रक्शन ही कन्स्ट्रक्शन व्यवसायातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीमध्ये विश्वासाला अधिक महत्व आहे. कंपनीमध्ये एकूण ६० कामगार काम करतात. या सर्व कामगारांचे हतावरचे पोट आहे. गेली अनेकवर्षे या कपनीमध्ये हे कामगार प्रामाणिकपणे काम करत आहेत. रमेश उबाळे व त्यांचे व्यवसाय बंधू यांनी योग्य विचार विनिमय करून भले यावर्षी आपल्या कंपनीला तोटा झाला तरी याचा विचार आता करणे योग्य नाही. आपला कामगार, मजुर वर्ग जगला पाहिजे ही उदात्त भावना ठेवून ६० कामगारांना अन्नधान्य वाटप केले तसेच या कामगारांना तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुम्ही मिळून कोरोनला हरवूया, असे म्हणत रमेश उबाळे यांनी कामगारांना दिलासा दिला.
ईश्वराने या जगात अनेक अमूल्य गोष्टी निर्माण केल्या आहेत. कोरोनाचे संकटही असेच आहे. ईश्वर जसा अदृश्य आहे. तसा कोरोनाही कुणाला दिसत नाही. ईश्वर आपल्या वर प्रेम करतो परंतु कोरोना आपला अदृश्य शत्रू आहे. छ. शिवाजी महाराज हे जसे शत्रूशी गनिमी काव्याने लढले, आपण घरामध्ये थांबून गनिमी काव्याने लढूनच कोरोनाला हरवूयात. काम नसले तरी घरामध्ये बसा. इतरत्र फिरू नका. प्रत्येकाने स्वतःची तसेच कुटूंबीयांची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही रमेश उबाळे यांनी यावेळी कामगारांशी बोलताना केले. बालाजी कन्स्ट्रक्शन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा दिलासही त्यांनी यावेळी कामगारांना दिला आहे.
आमदार, खासदार, कुठे आहेत?
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्या घराचे उंबरे झिजवून आपणकडून मत घेणारे जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे आमदार, खासदार सध्या कुठे आहेत. किती लोकप्रतिनिधींनी मास्क वाटले? किती लोकप्रतिनिधींनी सॅनिटायझर वाटले? किती लोकप्रतिनिधीने जनजागृतीसाठी खेडा खेड्यांमध्ये गाड्या पाठवल्या? असा सवाल करून रमेश उबाळे म्हणाले, आपणावर आज कोरोनाचे मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत एखाद्या वस्तीत, गल्लीत अन्नधान्य वाटप करून कुणाची जबाबदारी पूर्ण होत नाही. तर अशा परिस्थितीत संपूर्ण मतदारसंघाचा भार त्यांनी उचलला पाहिजे मतदारसंघात गरजवंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या परिस्थितीत लोकप्रतिनिधिंबरोबर सर्वांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे मतही उबाळे यांनी कुणाचेही नाव न घेता आपले मत व्यक्त केले आहे. तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रात 27 मार्च अखेर परजिल्ह्यातून तथा अन्य ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आकडेवारी- पुसेगाव 2185, डिस्कळ 1608, पुसेसावळी 1903, कातरखटाव 3538, निमसोड 2270, खटाव 1540, मायणी 1981, परदेशातून आलेले 33.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |