वरकटे-मलवडी : स्वातंत्र्य चळवळ,आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तीमत्व,परिवर्तनशील साहित्यिक, कवी,विचारवंत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवसाचे शिक्षण घेवून आपल्या जिवनात अमुलाग्र बदल घडवून संपूर्ण जगाला दाखवला. आण्णाभाऊंची लेखणी लाखात देखणी अशीच होती म्हणून थोर साहित्यसम्राट झाले. आण्णाभाऊंच्या विचारांची कास बहुजनांनी धरून आपल्याबरोबर समाजाचा विकास साधला पाहिजे अशाप्रकारचे प्रतिपादन बामसेफ चे जिल्हा संघटक एम डी चंदनशिवे यांनी केले. ते आण्णाभाऊंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त मातंग समाजमंदिर वरकुटे मलवडी ता.माण या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच बाळकृष्ण जगताप, अर्जुन यादव, मा.सरपंच भारत अनुसे, मा.सरपंच सौ.सुमनताई यादव, बाळासाहेब आटपाडकर, सुरेश बनगर, सुखदेव बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, ग्रा. पं. सदस्य सौ.वंदनाताई यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सचिन होनमाने यांनी आण्णाभाऊंच्या संघर्षमय जिवनावर प्रकाश टाकत, त्यांच्या जीवनकार्याचा आढावा जनतेसमोर मांडला. सरपंच बाळकृष्ण जगताप यांनी सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. शिवाजीराव शिंदे, वसंतराव जगताप, सोनवणे यांनीही विचार मांडले.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोंचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केले. यावेळी शाळाव्यवस्थापनचे अध्यक्ष बाबासाहेब मंडले, हणमंत आटपाडकर (चेअरमन), मल्हारी जगताप, अमोल यादव, निलेश यादव, सुरेश यादव, लक्ष्मण केंगार, मधुकर जाधव, संतोष यादव, नारायण यादव, अनिल केंगार, बाळासाहेब मिसाळ, भारत बनसोडे (अध्यक्ष), महावीर काटकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काळेल यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |