खंडाळा : मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यक्षम खासदार असायला हवेत; परंतु सातारकर जनतेच्या यापूर्वी ते नशिबात नव्हते. सातारचे यापूर्वीचे खासदार संसदेत अधिक काळ दिसायचे नाहीत आणि कधी बोलले नाहीत. त्यामुळे त्यांचा वेळ मला मिळत होता; पण आता माजी अडचण झाली आहे. आता सातारला सक्षम आणि अभ्यासू खासदार असल्याने ते तळमळीने प्रश्न मांडतात. त्याचा फायदा मतदारसंघाला होईल, असे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दरम्यान, राज्यात तीन पक्षांचे एकत्रित सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे क्षमता असताना मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देता आले नाही; पण त्यांचे काम चांगले आहे. त्यांना मंत्रिपदाची गरजही नाही. ते मिळायचे असेल तर त्यांच्या मेरिटवर ते मिळवतील; पण त्यांच्या कामाचा आवाका आणि क्षमता पाहता पक्षात त्यांचा मोठा मान आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांना निश्चितपणे सन्मानाचे स्थान मिळेल, असे आश्वासन त्यांनी खंडाळ्यातील जनतेला दिले.
खंडाळा येथील पत्रकार दिन सोहळा व राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी आ. मकरंद पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जि. प. सदस्य मनोज पवार, सौ. दीपाली साळुंखे, उपसभापती वंदना धायगुडे, दत्तानाना ढमाळ, पुरुषोत्तम जाधव, तहसीलदार दशरथ काळे, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले सरकार हे सर्वसामान्य माणसांचे आहे. नविन उर्जेने आणि विश्वासाने राज्याच्या हितासाठी हे सगळं जमवलंय. त्यामुळे सामान्य माणसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारावर सरकार काम करेल. विशेषतः महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न होतील. सध्या विरोधात असलेल्या पक्षातील अनेकजण सरकार फार काळ टिकणार नाही अशी टिका करतात. मात्र विरोधकांनी त्याची काळजी करू नये. तीन पक्षांचे एका विचार धारेवर बनलेले हे सरकार पुढील अनेक वर्षे जनतेची सेवा करेल.
सातारा जिल्हा आणि शरद पवारांचे चांगलं नातं आहे. एका विश्वासाने लोकं जोडली गेली आहेत. आजपर्यंत सर्वाधिक बळ सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्षाला दिले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा साहेब सातारला येतात तेव्हा ते नवी ऊर्जा घेऊन जातात. विधानसभा प्रचारातील सातारची सभा देशभरात गाजली. साताराची भूमी त्यांच्यासाठी टॉनिक बनली आहे, असे खा. सुळे म्हणाल्या.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |