05:19pm | Apr 09, 2019 |
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या दि. 10 रोजी फलटण येथील मोती चौक, शिंगणापूर रोड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या निमित्ताने प्रथमच फलटण शहरात येणार असल्यामुळे फलटणकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सुभाष देशमुख, ना. शेखर चरेगांवकर, ना. सदाभाऊ खोत, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार व पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. ऐनवेळी भाजप-शिवसेना महायुतीने फलटण तालुक्यातील युवानेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गळ्यात माढा लोकसभा निवडणूक उमेदवारीची माळ घातल्यामुळे फलटण तालुक्यासह माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तब्बल 23 वर्षानंतर फलटणकरांना आपल्या हक्काचा खासदार मिळणार आहे. फलटण-लोणंद या रखडलेल्या लोहमार्गाचे काम, कृष्णा-भीमा स्थैर्यीकरण असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न माढा लोकसभा मतदारसंघात प्रलंबित आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार फलटण, माण-खटाव मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. 2014 साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फलटण तालुक्यातील विकास खुंटला होता. फलटण तालुक्याचे प्रलंबित प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी हक्काचा माणूस नसल्यामुळे फलटण तालुक्याचा विकास होत नव्हता. बारामती, फलटण, शिरवळ या महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून खोळंबले आहे. खंडाळा, शिरवळ, लोणंद व फलटण परिसरात औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. परंतू मुलभूत सोयी-सुविधा नसल्यामुळे औद्योगिकीकरणाला खीळ बसलेली आहे.
महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या दि. 10 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये प्रथमच येत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या सभेत नक्कीच झडणार, सभेचा केंद्रबिंदू मात्र राष्ट्रवादी व विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत. कारण गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आत्ता भाजपात असलेल्या व पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेस पदाधिकार्यांना कशा पद्धतीने गोत्यात आणले, याचा हिशोब या सभेत होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |