04:06pm | Sep 21, 2019 |
सातारा : उपविभागीय पोलीस अधिकारी कराड नवनाथ ठकाजी ढवळे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून चिपळूण, जि. रत्नागिरी येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर चिपळूण येथील डीवायएसपी सुरज पांडुरंग गुरव यांची नियुक्ती झाली आहे. अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी रात्री उशिरा शासनादेश काढून राज्यातील पाच डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
दि. 18 ऑगस्ट 2017 रोजी नवनाथ ढवळे यांनी कराड डीवायएसपी पदाचा चार्ज स्विकारला होता. दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये ढवळे यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली. कराडसारख्या संवेदनशील समजल्या जाणार्या शहरात दोन वर्षाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शेतकरी आंदोलने तसेच मराठा क्रांती मोर्चेही दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये शांतपणे पार पडले. शेणोली येथील महाराष्ट्र बँकेवरील पडलेल्या दरोड्याचा दोन दिवसांत छडा लावून या दरोड्यातील आरोपींना जेरबंद करण्याचे काम ढवळे यांनी केले होते. एकूणच ढवळे यांची कराड येथील कारकीर्द अतिशय उत्कष्ठ ठरलेली आहे. ढवळे यांच्या जागेवर चिपळूण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची बदली झालेली आहे. कोल्हापूर येथे गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान माजी मंत्री तथा आ. हसन मुश्रीफ यांच्याबरोबर तु-तु-मै-मै झाली होती. त्यामुळे सुरज गुरव आपल्या दबंग स्वभावामुळे संपूर्ण राज्याला परिचित झाले होते. गुरव यांची कोल्हापूर तसेच चिपळूण येथील कामगिरी उत्कृष्ठ राहिल्यामुळे कराडसारख्या संवेदनशील शहरातही ते चांगले काम करतील, अशी अपेक्षा कराडकर करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |