सातारा : सातारा-कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरातील खोल दरीत मनिष शिवाजी लाड (वय २८, रा.यादोगोपाळ पेठ, सातारा) या युवकाचा मंगळवारी सायंकाळी मृतदेह सापडल्याने परिसर हादरुन गेला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिस व ट्रेकर्समधील युवकांच्या मदतीने मृतदेह काढत होते. दरम्यान, युवकाचा मृतदेह सापडल्याने युवकाची आत्महत्या की घातपात? याबाबतचे गूढ निर्माण झाले असून पोलिसांचा तपास सुरु झाला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, यवतेश्वर घाटात गणेश खिंड परिसरात मंगळवारी दुपारी खोल दरीच्या दिशेने दुर्गंधी पसरली होती. गुरे राखणार्या व परिसरात फिरायला जाणार्यांना ही बाब जाणवल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता सुमारे ८० फुटहून अधिक खोल दरी असल्याने पोलिसांनी दरीत उतरण्यासाठी ट्रेकर्सची यंत्रणा तैनात केली. काळोशी गावात जावून तेथून पायी चालत घटनास्थळ गाठले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना युवकाचा मृतदेह आढळला.घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. उशीरापर्यंत ओळख लागत नसल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात मनिष लाड हा युवक बेपत्ता असल्याचे समोर आल्यानंतर त्याचे वर्णन जुळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. मनिष दोन दिवसांपासून बेपत्ता होता त्याच्या आईने याबाबत पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिलेली आहे. मनिषच्या काही मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. पोलिसांनी रात्री मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |