08:53pm | Feb 21, 2020 |
सातारा : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात अद्यावत यंत्रसामुग्री तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी सातार्यात स्वकर्तबगारीवर हॉस्पिटल उभारले आहेत. ज्यांची अर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा रूग्णांचे नातेवाईक सातार्यात उपचार घेतात. पण सातारचे भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे सातारा येथून मुंबईतील हॉली फॅमेली रूग्णालयात उपचार घ्यावे लागले सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून सातार्यात उपचार का होऊ शकले नाहीत? याबाबत आता चर्चा होवू लागली आहे.
सातारा शहरात डझनभर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलांची जंत्री पहायला मिळत आहे. दोन दिवस रूग्ण दाखल झाला तर किमान 25 हजार एवढी शुल्क आकारणी केली जाते. त्यातून रूग्ण बरा होत असला तरी ग्रामीण भागातील मध्यमवर्गींयाना हे शुल्क परवडते. परंतु प्रत्येक वेळी रूग्ण बरा होईल याची खात्री नसते त्यामुळे काही वेळेला 10 ते 15 दिवस रूग्णांवर सातार्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्या रूग्णाला पुण्यामुंबईला घेवून जाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी किमान 80 ते 1 लाख रूपये अशा हॉस्पिटलचा शुल्कचा भरणा केल्यानंतर रूग्णाला नातेवाईकांच्या ताब्यात देतात. याबाबत फारसे कोणी गांभीर्याने घेत नाहीत. कारण यात अनेकांचे हितसबंध गुंतलेले असतात. सातार्यात अद्यापही मेडिकल कॉलेज उभे राहिलेले नाही. याठिकाणी उच्च पातळीवरील उपचाराचा वाणवा आहे हे आ.भोसले यांच्या मुंबईतील उपचाराने अधोरेखित झालेले आहे. सर्व सामान्यानां एक किंवा दोन दिवसात मुंबईला अधिक उपचारासाठी पाठवले नसते किमान आठवडाभर तर त्याची नाडी तपासून नातेवाईकांचा खिसा ढिल्ला केला असता याची आता चांगलीच चर्चा रंगू लागली. सातार्यात कमी पैशात चांगली सेवा देणारे डॉ. अनिल शहा, डॉ.जीवन लाहोटी,डॉ. उमेश पाटील, डॉ. संदीप काटे, डॉ.अच्युत गोडबले, डॉ. पटवर्धन, डॉ. रवी भोसले यांच्यासारखे सातार्यात अनेक डॉक्टर खर्या अर्थाने रूग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. त्यांच्यासारखे अनेक डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये रूग्णांना योग्य मोबदल्यात सेवा देत आहेत त्यांचे यानिमित्त कौतूक होत आहे त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत.
सातारा शहरातील एका प्रतिथ यश हॉस्पिटलने तर रूग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळालेले 50 हजार रूपये आपल्या खात्यात जमा झाल्यानंतर तो लाटण्याचा प्रकार केला याबाबत रूग्णाच्या नातेवाईकांनी रितसर सातारा शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण अद्यापही कारवाई होत नसल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. डॉक्टरांनी स्वत:ची ‘‘प्रतिभा’’ जपून वैद्यकिय सेवेत ‘‘यशवंत’’ व्हावे पण ‘‘संजीवनी’’ देतो म्हणत रूग्णांची लूट करू नये असा सर्वसामान्याचा सुर आहे. आ. भोसले यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे सातार्यात आधुनिक उपचार होवू शकत नसल्याने त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलचा आश्रय घ्यावा लागला आहे. यामुळे सातार्यातील वैद्यकिय क्षेत्रातील गुणवत्ता बाबत गुणवत्ता नियंत्रकांकडून तपासणी व्हावी अशी आता मागणी जोर धरू लागली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |