पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा अलिशान कार आणि एक ३३ लाख रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या वाहनांची किंमत तब्बल पाच कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील डीएसके यांचे कार्यालयाची सोमवारी झडती घेण्यात आली असून, त्यात पोलिसांना महत्त्वाच्या फाइल मिळाल्या आहेत.
ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. डीएसकेंना दिल्लीतून अटक केल्यानंतर दोघांना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली असून पती-पत्नी पोलिस कोठडीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून डीएसके यांच्याकडे तपास करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून पाहिजे ती माहिती पोलिसांना मिळत नाही. पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये कर्ज, एफडी व प्रोजेक्ट फाइल आहेत. या कागदपत्रांच्या आधारे डीएसकेंच्या सीएकडे चौकशी केली जात आहे. जंगली महाराज रस्त्यावरील डीएसकेंच्या मुख्य ऑफिसमध्ये तपासादरम्यान झाडती घेण्यात आली आहे. त्यात पोलिसांना काही महत्त्वाच्या फाइल मिळाल्या आहेत. या ऑफिसमध्ये फाइलची संख्या मोठ्या प्रमाणात असून गेल्या तीन दिवसांपासून येथील ऑफिसमध्ये झडती घेतली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सोमवारीही सायंकाळपयर्यंत झडती सुरू होती.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी तपासात डीएसकेंकडे असणाऱ्या सहा अलिशान गाड्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पावणेदोन कोटींची पोर्शे, अडीच कोटींच्या दोन बीएमडब्लू, टोयटा कॅमरी दोन, पन्नास लाखांची ऑडी अशा सहा कार जप्त करण्यात आल्या आहेत. तर, ३३ लाख रुपये किमतीची ऑगस्टा बाइक जप्त केली आहे. या वाहनांची पाच कोटी रुपयांच्या जवळपास किंमत आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही सर्व वाहने जप्त करून शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात लावण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |