05:36pm | Dec 06, 2019 |
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागाच्या भरती प्रक्रिया 2017 पासून महा परिक्षा पोर्टलच्या माध्यमातून होत आहेत. परंतू महा परिक्षा पोर्टल माध्यमातून आजपावेतो झालेल्या सर्व परीक्षांमध्ये खूप अनागोंदी कारभार होत असून परीक्षार्थीच्या समस्या सोडविण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. या सर्वांमागे गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेवून मागील तीन वर्षापासून आम आदमी पार्टी व आप युवा आघाडी आणि इतर विद्यार्थी संघटना यांनी महा परिक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी लाऊन धरली होती. महा परिक्षा पोर्टल म्हणजे महाष्ट्राचा व्यापम् घोटाळाच असून याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगावकर यांनी केली आहे.
मुळातच या ऑनलाईन परीक्षेसाठी पुरेसे संगणक नसणे, त्यामुळे या परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेणे, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करणे, काठिण्य पातळी वेगवेगळी असणे, चुकीचे प्रश्न, अनेकवेळा सर्व्हर डाऊन राहणे, प्रत्येक परीक्षेवेळी नवीन प्रोफाईल बनवून नव्याने माहिती भरावी लागते, ऑनलाईन परीक्षेसाठी अतिरिक्ती फी आकारली जाते, परीक्षा देण्यासाठी परिक्षार्थींना अनेकवेळा दुसर्या जिल्ह्यात जावे लागते, वेळेवर सूचना न देणे, लहान व खाजगी परिक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसणे, अपुरी सुरक्षा, वेळेवर परीक्षा न घेणे, निकाल उशीरा लावणे, डमी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवणे, खाजगी संगणक सेंटरमध्ये परीक्षा घेणे, बी.ए.-बी.कॉम चे विद्यार्थी परीक्षक म्हणून नेमणे, अनुपस्थित उमेदवारांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत असणे या आणि अशा अनेक भानगडी पुढे आल्या आहेत.
सद्य स्थितीत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने महा परिक्षा पोर्टल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महा परिक्षा पोर्टल बंद करावे. त्याऐवजी सर्व 1 ते 4 वर्गाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात याव्यात, महा परिक्षा पोर्टल निर्मिती व्यवहार आणि यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या व्यवहार आणि यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या परिक्षांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, महा परिक्षा पोर्टलच्या माध्यमातून यापुढील सर्व परिक्षा स्थगित करण्यात याव्यात, केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सर्व परिक्षांचे शुल्क एकसमान व अत्यल्प करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |