सातारा : पश्चिम बंगालमधून पर्यटणासाठी आलेल्या सातार्यात आलेल्या युवतीचा बारामोटेची विहिर ता.लिंब येथे अनोळखी तीन ते चार युवकांनी रस्ता दाखवण्याचा बहाणा करुन विनयभंग केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संशयितांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ रोजी पश्चिम बंगाल राज्यातील २४ वर्षीय युवती सातारा येथे पर्यटणासाठी आली असून ती सध्या सातारामधील एका हॉटेलमध्ये थांबलेली आहे. लिंब ता.सातारा येथील बारामोटेची विहिर हे प्रसिध्द असल्याने ती युवती दि. २६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेथे गेली होती. बारामोटेची विहिर पाहत असताना ती युवती कॅमेर्याद्वारे फोटो काढत होती. याचवेळी काही अनोळखी युवक आले व त्यांनी युवतीचा कॅमेरा घेवून फोटो काढायचे असल्याचे सांगितले. युवकांनी कॅमेरा घेतल्यानंतर तो कॅमेरा परत त्या युवतीला दिला.
कॅमेरा घेवून ती युवती तेथून बाहेर पडली व चालत निघाली. युवती चालत असतानाच संशयित युवकांनी दुचाकीवरुन त्या युवतीचा पाठलग केला. संशयित युवकांनी त्या युवतीला रस्ता दाखवतो असे सांगून मुख्य रस्त्यावरुन न नेता आड रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या युवतीचा लक्षात आल्यानंतर तीने स्वत: सुटका करुन घेतली. अशाप्रकारे पाठलग करुन आड रस्त्याला नेण्याचा प्रयत्न करत विनयभंग झाल्याने त्या युवतीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अनोळखी युवकांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटणस्थळे आहेत. मात्र परप्रांतीय युवतीची छेड काढली गेल्याने युवती व महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |