01:02am | Jul 23, 2019 |
सातारा : घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा देण्यासाठी 1500 हजार रुपयांची लाच मागून ती खासगी व्यक्तीकडून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने भूमी अभिलेख कार्यालय, कराड येथे छापा टाकला. याप्रकरणी वर्ग- 2 च्या अधिकार्यासह एका खासगी व्यक्तीला अटक केली.
गोविंद सुभाष बेलवणकर (वय 47, रा.कार्वे नाका, कराड), ताजुद्दीन इब्राहिम शिकलगार (वय 71, रा. रेठरे बु. ता.कराड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील ताजुद्दीन शिकलगार हा खासगी व्यक्ती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे कराड परिसरातील आहेत. तक्रारदार यांना घराबाबत केलेल्या हक्क सोड पत्र दस्ताची नोंद करुन तसा उतारा पाहिजे होता. यासाठी ते कराड कार्यालयातील गोविंद बेलवणकर याला भेटले. संबंधित कामासाठी तक्रारदार याला 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी सातारा एसीबी विभागात 20 रोजी तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
2 हजार रुपयांच्या लाचेबाबत तक्रारदार यांनी संशयितांना भेटून रक्कम कमी करण्याची विनंती केली असता 1500 रुपयांची तडजोड झाली. लाचेची रक्कम सोमवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम खासगी व्यक्ती ताजुद्दीन शिकलगार याने स्वीकारली. ही रक्कम कराड येथील मोकळ्या जागेत स्वीकरली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ट्रॅप झाल्याची माहिती पसरताच कराडमध्ये खळबळ उडाली.
सातारा शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंदराव सपकाळ, संजय साळुंखे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |