12:17pm | Nov 20, 2018 |
सातारा (अजित जगताप) : सातारा पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद भुषविलेल्या सौ. रंजना रावत यांनी आपल्या कन्येच्या लग्न सोहळ्याचे निमंत्रण पत्रिका स्वत: देण्यासाठी तब्बल आठ वर्षानंतर सातारा पालिकेत आल्या. त्यांच्या आगमनाने सातारा पालिकेच्या कर्मचार्यांनी उभे राहुन आदरयुक्त स्वागत केले. त्याचबरोबर आपुलकीच्या कारंज्याही उडाल्या. या अनुभवाने खर्या अर्थाने नगराध्यक्षा पदाची शान राखल्याने त्या भारावून गेल्या. नगराध्यक्षांच्या दालनातील तत्कालीन महिला शिपाई कर्मचार्याला त्यांनी अलिंगन देवून भेट घेतली. यावेळी सध्याच्या कारभाराबाबतही दिलखुलासपणे चर्चा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सातारा शहरात श्रीमंंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांना 1976 साली पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यानंतर त्यांचे सुपूत्र खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्य कुटूंबातील सौ. रंजना रावत यांना 17 वर्षापुर्वी नगराध्यक्षपदावर विराजमान केले. या निवडणुकीत विरोधी आघाडीचा दारूण पराभव झाला होता. सातारा विकास आघाडीचे विमान वेगाने उडाले. त्यांनतर खा. उदयनराजेंची राजकीय चढती कमान उंचावत गेली. त्यावेळी सत्ताधारी आघाडीचे 38 नगरसेवक निवडूण आले होते. तर विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. योगायोग म्हणजे आजही नगरसेवक अशोक मोने व वसंत लेवे ही त्यावेळी संताजी, धनाजीची जोडी आता विभक्त झाली आहे. सौ. रंजना रावत यांनी पाच वर्षे नगराध्यक्ष पदावर काम करताना सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांना विश्वास घेवून काम केले होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारीही खुष होते. आज सोमवर दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता माजी नगराध्यक्षा सौ. रावत यांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण नगराध्यक्षा व नगरसेवक पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अपवादाने त्या नगरपालिकेत आल्या होत्या. त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या कारणासाठी नगरपालिकेत आल्या असा प्रश्न अनेकांना पडला. पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात मिळाली. त्यावेळी लग्नाला उपस्थितीत रहाण्याची आग्रहाची विनंती सुध्दा सौ. रावत यांनी केली. कारण अलिकडे साधा नगरसेवक सुध्दा कोणत्यातरी व्यक्तीच्या हातून पत्रिका पाठवतो. पण माजी नगराध्यक्षा स्वत: आल्या याबाबत अनेकांनी आश्चर्श व्यक्त केले.
विद्यमान नगरसेवक अल्लाउद्दीन शेख यांनी सुध्दा रावत यांच्या कामकाजाचे कौतुक करत अधिक बोलणे टाळले. योगा योग म्हणजे यावेळी सातारा नगर पालिकेत सौ. स्मिता घोडके, सौ. सुजाता राजेमहाडीक, सौ. रंजना रावत या तीन माजी नगराध्यक्षांनी एकत्र येवून फोटोशेसन केले. पण विद्यमान नगराध्यक्षा सौ. माधवी कदम या मात्र अलिप्त राहिल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |