खंडाळा : तालुक्यातील धनगरवाडी येथील सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सास-याला खंडाळा न्यायालयाने एक वर्ष आठ महिन्यांची सक्तमजूरी तर एक हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास दहा दिवसाची साधी कैद खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सुनावली आहे. संतू साधू काळे रा.धनगरवाडी ता.खंडाळा असे शिक्षा सुनावलेल्या सास-याचे नाव आहे. विशेष म्हणजे एका वर्षात संबंधित केसचा निपटारा न्यायालयाने केला आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या जमदाडेच्या मळ्यात हरिभाऊ जमदाडे यांच्या शेतात दि.11 जूलै 2017 रोजी संबंधित पिडीत विवाहित सून हि पतीबरोबर व सास-यांबरोबर बकरी घेऊन वास्तव्याला होती. दरम्यान,संबंधित पिडीत विवाहितेचा पती हा अंघोळीसाठी घरी गेला असता त्याठिकाणी सासरा संतू काळे आला. यावेळी संतू काळे याने संबंधित पिडीत विवाहित सुनेचा हात पकडत मारहाण करत विनयभंग केला. यावेळी संबंधित सूनेने दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला संतू काळे याच्याविरुध्द विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रसंगी शिरवळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांनी तपास करत दोषारोपपञ खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दाखल केले होते. यावेळी सरकारी वकील महेश यादव यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरत खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी.एम.गिरी यांनी संतू काळे याला विनयभंगप्रकरणी दोषी धरत एक वर्ष आठ महिन्यांची सक्तमजूरी तर एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साधी कैद सुनावली आहे.यावेळी संबंधित संतू काळे हा अटक केल्यापासून आजतागायत कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. याप्रकरणी सरकारी वकील महेश यादव यांना प्राँसिक्यूशन स्काँडचे पोलीस हवालदार रविंद्र कदम,सुनिल गायकवाड ,सुरेश मोरे यांनी सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |