07:24pm | Jan 19, 2020 |
सातारा : ब्रिटीशाच्या जोखडातून देश स्वतंत्र होऊण उणीपुरे पाऊण शतक ओलांडले आहे. देश पारतंत्र्यात असताना ब्रिटीशांना चले जाव असे म्हणत सातारच्या मातीतून अनेक चळवळींनी जन्म घेतला. जय जवान, जय किसान आणि जय सहकार या त्रिसूत्रींचा जन्मही खर्या अर्थाने या मातीतूनच झाला. परंतू चळवळीचा जिल्हा असे बिरुद मिरवणारा सातारा जिल्हा मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी पारतंत्र्यात गेला. सातारकरांच्या बोकांडी महसुली डायन येऊन बसली. सातार्यासारख्या वैभवशाली परंपरा जोपासणार्या जिल्ह्याला उतरती कळा लागली. ‘रेती के धंदे में मंदी आयी तो, या महसुली डायनने ठगी करना शुरु कर दी’ जो घावेल त्याला उभा-आडवा ओरबडायचा. परंतू चार दिवसांपूर्वी महसुली डायनच्या गच्छंतीमुळे सातारा जिल्हा पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे. मात्र डायन भुर्रर्रऽऽ उडाली असली तरी तिचे ‘घेणार’ हात मात्र त्याच ठिकाणी दबा धरुन बसलेत. नवीन आलेला कारभारी या हातांना कलम करणार, की त्यांचा काटा किर्रर्रऽऽ करणार, हे मात्र येणार्या काही दिवसांतच समजणार आहे.
सातारा जिल्ह्याला विपुल असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रामशास्त्री प्रभुणेंच्या या पावन झालेल्या भूमीने औरंगजेबापासून ब्रिटीशांपर्यंत अनेकांना सळो की पळो करुन सोडले, परंतू तीन वर्षांपूर्वी घात झाला. ताराराणी पासून झाशीच्या राणीपर्यंतचा वारसा सांगणार्या या जिल्ह्याने उरावर बसलेल्या महसुली डायनच्या समोर शेपट्या घातल्या. लायझनिंगच्या भानगडी शिजवण्यासाठी मी-मी म्हणणार्या अनेक तालेवरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबर्यात नाकाने कांदे सोलले. परंतू ‘सातारा टुडे’ने आपला स्वाभिमानी बाणा सोडला नाही. महसुली डायन घावेल तिथे बुकलून काढली. परंतू शेवटी एका तलवारीचे बळ असे कितीसे असणार? परंतू तिच तलवार क्रांती घडवू शकते, असे म्हणत ‘सातारा टुडे’ने गेल्या अडीच वर्षात महसुली डायनच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर आणल्या. महसुली डायनच्या दट्ट्यामुळे बॅकफूटवर गेलेले सातारकर फ्रंट फूटवर आले. महसुली डायनच्या दहशतीमुळे अबोल झालेले घडाघडा मनमोकळे करु लागले. डायनच्या भानगडींचा लेखाजोखा प्रकाशित करायचा झाला तर अनेक खंडही अपुरे पडतील. ‘सातारा टुडे’ने वारंवार महसुली डायनचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे नव्याने इथे काही सांगण्याची गरज उरली नाही. डायनने भानगडी करुन जिल्ह्यातून सुमारे शंभर कोटींचा आकडा पार करुन एक उच्चांक प्रस्थापित केला आहे. तो कसा केला, हे जिल्हाधिकारी कार्यालयातील एखादा शिपाईही सांगू शकतो. महसुली डायनची बदली जरी झाली असली तरी ती पुन्हा वर जाऊन सातारकरांच्या बोकांडीच बसलेली आहे. परंतू ज्याठिकाणी बसलेली आहे, त्याठिकाणी तिला सातार्यासारखी मस्ती करता येणार नाही. त्यामुळे एकूणच सोन्याच्या पिंजर्यात बसून तिला सातारासारखे काहीच हाशील करता येऊ शकणार नाही. कालच सातार्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी ‘सिंगल बाईंचा ट्रिपल बार’ अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमांमध्ये फिरवून तिची उरलीसुरलीही काढलेली आहे.
सुमारे तीन वर्षांनंतर दिल्लीचा एक उमदा गडी कारभारी म्हणून सातारा जिल्ह्याला लाभलेला आहे. या गड्याने आतापर्यंत कोकणात आणि विदर्भात आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. आपल्या अभिनव कार्यशैलीमुळे या गड्याने दोन्ही प्रांतांमध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे. सातार्यात बदली झाल्यानंतर त्यांनी सातारा सारख्या ऐतिहासिक आणि गौरवशाली भूमित काम करायला आवडेल, असे सांगून आपले आगामी इरादे स्पष्ट केले आहेत. परंतू गेल्या तीन वर्षात महसुली डायनने केलेली घाण या गड्याला साफ करावी लागणार आहे. एक कांदा नासला तर तो इतर कांद्यांनाही सडवतो. त्या पद्धतीने महसुली डायनने उभे केलेले साम्राज्य प्रथम त्यांना उद्ध्वस्त करावे लागेल. ब्रिटीशांच्या कार्यशैलीला लाजवेल, अशा पद्धतीची समांतर असे संस्थान महसुली डायनने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकालात उभे केले. साम-दाम- दंड हे भेद वापरुन तिने सातार्यात एकप्रकारचे संस्थान उभे केले आहे. परंतू हे संस्थान आता खालसा करण्याची वेळ आलेली आहे. महसुली डायनचे घेणारे हात अजूनही त्याच ठिकाणावर आहेत. ते हात आता या नव्या कारभार्यांना कलम करावे लागणार आहेत.
आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करुन जिल्ह्यातील अधिकार्यांना वाकवून महसुली डायनने कोट्यवधी कमवले. महसुली डायन गेल्यानंतर तिच्या अनेक भानगडी आता बाहेर येवू लागल्या आहेत. रेती के धंदे में मंदी आयी तो महसुली डायनने ठगी करना शुरु कर दी र्थी, तो सिंग साब आपको रेती भी और ठगी भी बंद करनी है । तर आणि तरच सातारा जिल्ह्याला गतवैभव प्राप्त होणार आहे.
अंडरवर्ल्डलाही लाजवतील असे कोडवर्ड
महसुली डायनने गेल्या तीन वर्षात अनेक मॉड्युल तयार केले. अगदी शिपाई-ड्रायव्हरपासून अधिकार्यांपर्यंतचे तिचे हे नेटवर्क भलतेच स्ट्रॉंग होते. ‘लाचलुचपत’चा ससेमिरा नको म्हणून ज्या पद्धतीने अंडरवर्ल्ड आणि इंटिलिजन्समध्ये ज्या कोडवर्डचा वापर केला जातो, असे कोडवर्ड तिने तयार केले होते. उदा. बिनशेतीसाठी एखाद्या पंटरने दहा लाख रुपये घेतल्यास मॅडम वो दस टॅबलेट मेडिकल से लिये है, वो टॅबलेट घरपे या हॉस्पिटल पे पहुँचा दू’ अशा पद्धतीचे कोडवर्ड महसुली डायनने आपल्या पंटरसाठी तयार केले होते. तिचे यजमान ‘कर’ गोळा करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे मिळालेल्या पैशाची विल्हेवाट लावली जात होती. मध्यंतरी याच यजमानाने तासवडे टोल नाक्यावर टोल देण्यातून मारही खाल्ला होता. मात्र झाकली मुठ सव्वा लाखाची, म्हणत जी शिल्लक आहे, ती पण जायची असे म्हणत त्याचा बोभाटा होवू दिला नाही. मात्र भिंतीलाही कान असतात. हळूहळू यजमानाने का मार खाल्ला, हेही लोकांना समजले आहे.
पैसे देऊनही बंदुकरावांना दिवाळीची पिस्तुल
हल्ली कंबरेला पिस्तूल लावणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. ज्याला गरज आहे, ते कुठेही शायनिंग न करता आपली बंदुक बाळगतात. परंतू जिल्ह्यातील काहींना पोलीसाच्या कंबरेला असलेली बंदुक बघून आपल्याही कंबरेला अशीच बंदुक असावी, पोलीस होता नाही आले म्हणून काय झाले...? असे म्हणत अनेकांनी बंदुकीचे फॉर्म भरले. लायसन्स मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सेटिंग लावली. पण बाई लयी कडवट. पैशाशिवाय तिच्याकडे दुसरी गोष्ट नाय. जी बाई ब्लाऊज शिवला तरी गरीब बिचार्या त्या टेलरचे पैसे बुडवते, तर तिच बाई बंदुकरावांना कशी सोडणार? तीन लाखांपासून पाच लाखांपर्यंतची बिदागी दिल्याशिवाय बंदुकरावांना लायसन्स मिळत नव्हते. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक बंदुकरावांची लायसन्स पैसे देऊनही केवळ सहीवाचून रखडली होती. तीच गत बिल्डरांचीही होती. बिगरशेतीसाठी अनेकांनी लाखो रुपये मोजले होते. आज होईल, उद्या होईल या आशेवर ते बसले असतानाच अचानक एक दिवस मंत्रालयातून खलिता आला. महसुली डायन भुर्रर्रऽऽकन उडाली. आता घेणार्या मध्यस्थी हातांना हे बंदुकराव आणि बिल्डर भेटून तेवढं सहीचं बघा, असे विनवू लागले. सहीला काय अर्धा मिनिटपण लागत नाही, असे म्हणत त्यांची भाबडी समजूत काढू लागले. परंतू डायनने सही सोडाच पैसे घेणार्याला दर्शनही दिले नाही. त्यामुळे पैसे देऊनही अनेक बंदुकरावांना येणार्या दिवाळीत खेळण्यातली बंदुकच चालवावी लागणार आहे.
‘त्या’ गिर गायींचं करायचं काय?
घटनेने बहाल केलेल्या आपल्या अधिकारांचा वापर कसा करायचा आणि त्या अधिकारांच्या माध्यमातून सूखसोयी मिळविण्यासाठी यंत्रणेचे दमण कसे करायचे याचे कसब जिल्ह्यात येण्यापूर्वीच महसुली डायनने आत्मसात केले होते. जिल्ह्यातील लेकरं उपाशी ठेवून या बयेनं स्वत:ची मुलं मात्र तुपाशी ठेवली. घरी दूध घालणारा दूधवाला शुद्ध, सात्विक दूध घालेल याचा कोणाला नेम नसतो. त्याच पद्धतीने महसुली डायनने कार्यभार स्विकारताच पशू संवर्धन विभागातल्या अधिकार्याला फर्मान सोडले. आठ दिवसांच्या आत दोन धष्टपुष्ट, दुधाळ गिर गायी मिळायला हव्यात. आता मॅडमचा आदेश मिळाल्यानंतर त्या अधिकार्याची बोबडीच वळली. परंतू मॅडमचा आदेश शिरसावंद्य मानत त्याने आदेशाप्रमाणे गिर गायींची व्यवस्थाही केली. कर्मवीरांच्या शिक्षण संकुलाच्या पुढ्यात या दोन्ही गायी बागडू लागल्या. रोज ताजे दूध, तुप आणि लोण्याचा दरवळ दरवळू लागला. या तुपाने, दुधाने डायनचं वजनही भलतंच वाढलं. परंतू वजन अच्छा होता है, असे म्हणत त्यांनी वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष केलं. परंतू चंगळ फार काळ चालत नाही. तीन वर्षानंतर या गिर गायींच्या नशिबी वनवास आला आहे. डायन गेल्यानंतर या गिर गायींचं करायचं काय? असा प्रश्नही अधिकार्यांना पडलेला आहे. आता त्या गिर गायी ट्रकमधून न्यायच्या, की एअरलिफ्ट करायच्या? पुण्यात नेऊन ठेवायच्या कुठं? असे अनेक प्रश्न महसुली डायनसमोर पडलेले असणार. जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन ठेकेदारांशी साटलोटं करुन महसुली डायनने आपली मुलं मात्र गलेलठ्ठ केली. पण जिल्ह्यातील लहान मुलांना उपाशी ठेवून तिने काय मिळवले? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
- संग्राम निकाळजे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |