03:41pm | May 18, 2019 |
सातारा : सातारा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणार्या गणेश वाईकर या तरुणाच्या काल दि. 17 रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान, गणेश वाईकर या तरुणाने बनावट ओळखपत्राद्वारे अनेकांना गंडा घातला असल्याचा संशय लोणावळा पोलिसांना असून याबाबत लोणावळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गणेश गोपीनाथ वाईकर रा. कार्ला, ता. मावळ, जि. पुणे हा इसम सातारा जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगत असल्याची गुप्त माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. नि. लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी गणेश वाईकर याच्या घरावर काल दि. 17 रोजी सायंकाळी सात वाजता लोणावळा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल मिळून आले. यावेळी अधिक चौकशी केली असता गणेश वाईकर याचा पोलीस दलाशी काहीही संबंध नाही, असे दिसून आले. दरम्यान, लोणावळा पोलिसांनी गणेश वाईकर याला अटक केली आहे. त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बनावट शासकीय ओळखपत्र बाळगणे तसेच आर्म ऍक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलीस दलातील अधिकार्याचे बनावट ओळखपत्र बाळगल्यामुळे सातारा पोलीसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे समजते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |