कराड : पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची नुकतीच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदी निवड झाली आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शंभूराज देसाई यांनी कराडला भेट दिली. या भेटीदरम्यान शंभूराज देसाई यांना पृथ्वीराज चव्हाण कराड मध्ये आहेत हि माहिती मिळताच ना. शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पाटण कॉलोनी येथील निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी शंभूराज देसाई यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी आ. चव्हाण यांच्या पत्नी सौ सत्वशीला चव्हाण यांनी शंभूराज देसाईंचे औक्षण केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष झाकीर पठाण, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजित गुजर, सुनील बरिदे, दिलीप देशमुख, लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, सतीश पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, शंभूराज देसाई यांना मंत्रिपद त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्या नंतर जवळपास तीन दशकानंतर मिळाले आहे. माझे मूळ गाव कुंभारगाव हे पाटण तालुक्यातीलच आहे तसेच स्व बाळासाहेब देसाई हे माझ्या वडिलांसोबत संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. राज्यातील राजकारणातही स्व बाळासाहेब यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता त्यांनी महाराष्ट्राच्या राज्य सरकारमध्ये शिक्षण, कृषी, गृह आदी प्रमुख खाती सक्षमपणे सांभाळली होती. स्व बाळासाहेब यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत जी कामे केली आहेत त्याची नोंद आजही घ्यावी लागते. स्व बाळासाहेब देसाई यांच्यासारखे सक्षमपणे शंभूराज देसाई हे आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपला वेगळा ठसा उमटवतील असा विश्वास याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |