सातारा : शाहूपुरी येथे बांधत असणार्या इमारतीत गाळा देण्याच्या बहाण्याने शिक्षकाची 5 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितांमध्ये पुणे येथील दोघांचा समावेश आहे.
विजय दत्तु बोरकर (रा. कात्रज,पुणे), जतीन कांतीलाल सुराना (रा. मुकुंदनगर, पुणे), अश्विन वसंतराव सुर्यवंशी (रा. दत्तछाया कॉलनी, शाहूपुरी) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजय रघुनाथ दिघे (रा.आंबेघर ता.जावली) यांनी तक्रार दिली असून ते शिक्षक आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथील माहेश्वरी कॉर्नरच्या जागेत इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली होती. दिघे यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली व सुरु असणार्या इमारतीत एक गाळा विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिघे यांनी संबंधित तिघांशी चर्चा केली. त्यानुसार 21 नोव्हेंबर 2015 मध्ये त्या तिघांना चेकद्वारे 5 लाख रुपये दिले. मात्र तिघांनी गाळा खरेदी करण्याबाबतचा करार करुन देण्यास टाळाटाळ सुरु केली. वारंवार संपर्क करुनही ते तिघे खरेदी करार करुन देण्याचे तसेच घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करु लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिघे यांनी याची बुधवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |