12:33am | Jun 16, 2018 |
सातारा : साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या कार्यपध्दतीवर आरोप करत असतानाच सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा उदयनराजे भोसले यांनाही लक्ष्य केले होते. त्याचा समाचार उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता सडकून तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही उपरोधिक टीका केली. पृथ्वीराज चव्हाणांना सही करायला वेळ नव्हता. इतके ते व्यस्त होते, असा आक्षेप घेतच त्यांनी सही का केली नाही, हे मला माहित नाही, असेही नमूद केले. दरम्यान, 'जशी माझी खासदारकी आहे, तशी त्यांचीही आमदारकी आहे, असा इशाराही उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांना देवून टाकला आहे.स्वत: काही करायचे नाही, आणि दुसरे काही करीत असतील तर त्यांना आडवे पाडायचे काहीच कामे न करता दुसर्याच्या अंगावर चिखल फेक करायला अक्कल लागत नाही कामे करायला अक्कल लागते. आमचे काका तद्नंतर तुम्ही चाळीस वर्ष सत्तेत होता. मी केवळ दहाच वर्ष सत्तेत आहे. रडीचा डाव खेळू नका. गांधी मैदानावर या, मी ही येतो असा ईशारा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा नामउल्लेख न करता पत्रकार परिषदेत दिला.
'उदयनराजेंच्या पोटात एक अन् ओठावर एक' असे म्हणणारे आमचे बंधू शिवेंद्रसिंहराजे डॉक्टर कधी झाले, अशी कोपरखळी मारुन उदयनराजे म्हणाले, 'शिवेंद्रसिंहराजेंच्या वक्तव्यांनी मला हसू की रडू हेच कळत नाही. मी साताऱ्यात शांतपणे काम करत आहे. काम करत असताना कधी दुजाभाव केल नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची एंट्री होत असताना 'नायक नहीं खलनायक हँू मैं..', हे गीत ऐकले. खलनायक म्हणजे व्हिलन, असे मी कधी त्यांना म्हणणार नाही. मी कामाच्या जोरावरच बोलतो; कारण नसताना मी कोणावर आरोप करत नाही आणि माझ्यावरही कोणी करु नयेत, हे शिवेंद्रसिंहराजेंना माझे सांगणे आहे. मी संघर्षातून उभा राहिलो. यांच्यासारखा मला राजकीय वारसा लाभलेला नाही.'
सातारा नगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक सातशे कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. अन्य काही कामे मार्गी लावली आहेत, असा दावा करुन उदयनराजे म्हणाले, 'तुम्हाला कोणी अडवले होते का कोणी बेड्या घातल्या होत्या. का तुमचे हातपाय बांधले होते. ४२ वर्षे सत्ता असतानाही सत्ता नाही म्हणून आता सांगत आहात. एका सहीने तुम्ही मला २२ महिने आत घालवले. अहो, तुमच्याकडे काम करण्याचीच इच्छाशक्ती नाही. त्यामुळे तुम्ही तर काय करणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही माझा विश्वासघात केला. मनोमिलनाच्या नावाखाली नको ते लोक आडवे आणण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांच्याशी मी बांधील आहे. जे जाहीरनाम्यात छापले, त्याचीच पूर्तता केली. प्रत्येकवेळी तुमचा नाकर्तेपणा दाखवू नका. रडीचा डाव खेळणे आता बंद करा.'
ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली त्या संस्थेसाठी राजघराण्याचेही मोलाचे योगदान आहे. असे असताना मी केवळ राजघराण्यातील माझ्या नावाचे वावडे असेलतर आ. शिवेंद्रसिंराजे तरी आवडतात, मग त्यांना संस्थेवर पवार साहेबांनी घ्यायला हवे होते. ज्यांना काही गंध नाही अशा लोकांना संस्थेवर घेतले त्यामुळे रयत एक प्राईव्हेट संस्था झाली आहे. जर रयत संस्थेवर शिवेंद्रसिंहराजेंना घेतले असते तर त्यांच्या संस्था विलीनीकरण केल्या तशी रयत संस्थाही विलीनीकरण करावी लागली असती असा टोला मारून खा. उदयनराजे म्हणाले, त्यांचे 42 वर्षाच्या सत्तेतील जाहिरनामे काढा आणि आमच्या सत्तेतील जाहिरनामे बघा. जनतेला दिलेली सर्व वचने पुर्ण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. शहरात आज पोवई नाका ग्रेड सेप्रेटरचे काम, भुयारी गटार योजना, कास धरण उंची वाढविणे, घरकुल अशी विविध सुमारे 700 कोटीची कामे सुरू आहेत. पालिकेचे बजेट हे 150 कोटीचे असताना 700 कोटीची कामे पालिका इतिहासात कधीच सुरू झाली नव्हती. पाणी, कचरा असे प्रश्न घेवून आरोप करणे चुकीचे आहे. 50 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून यापुढे पाणी लोकांना मिळणार आहे.
साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या कार्यपध्दतीवर आरोप करत असतानाच सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा उदयनराजे भोसले यांनाही लक्ष्य केले होते. त्याचा समाचार उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता सडकून तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही उपरोधिक टीका केली. पृथ्वीराज चव्हाणांना सही करायला वेळ नव्हता. इतके ते व्यस्त होते, असा आक्षेप घेतच त्यांनी सही का केली नाही, हे मला माहित नाही, असेही नमूद केले. दरम्यान, 'जशी माझी खासदारकी आहे, तशी त्यांचीही आमदारकी आहे, असा इशाराही उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांना देवून टाकला आहे.
सो जा..बेटे शिवेंद्रसिंहराजे आ जायेंगे : खा. उदयनराजे
शिवेंद्रसिंहराजेंनी दाडी वाढवून वेगळा लुक केला आहे. मै नायक नही...‘खलनायक’ हू. हे चांगले आहे. खलनायक म्हणजे हा ‘व्हिलन’च असतो. स्पर्धा करावी तर कामातून असे वेगळे लुक करून करू नये. मला यावर खोलात जावून बोलायचे नाही. पण दाडी वाढवून लोकांना दम देण्यापेक्षा जप करत बसा. नाही तर लोक म्हणतील सो..जा..बेटा शिवेंद्रसिंहराजे आ जायेंगे.
'त्या' जैनला मागेच ठोकले असते..!
साताऱ्यात उद्योग येत नसल्याच्या अनुषंगानेही उदयराजेंनी भाष्य केले आणि खंडाळा, शिरवळ येथील उद्योगजगतातील परप्रांतियांच्या दादागिरीवर आसूड ओढला. सोना ॲलाईज कंपनीच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी आक्षेप घेतले आणि येथील बिहारी लोकांच्या दादागिरीचाही समाचार घेतला. कोण तो जैन. त्याला मारायचे असते तर मागेच ठोकला असता. कशाला त्याला सर्किट हाऊसला बोलावून घेतले असते. त्यांच्याशी मी चर्चा केली तर मी त्यांना दम दिला, मारहाण केली, असा माझ्यावरच आरोप ठेवला. खंडाळा तालुक्यात हा सर्व प्रकार एका स्वंयघोषित नेत्यांमुळे चालला आहे. त्यांचे नाव घेण्याचीही मला किळस वाटते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |