सातारा : गिनिज वर्ल्ड बुकात नोंद झालेली आणि सातारकरांची अभिमानाची स्पर्धा म्हणून जगभरात गौरविलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या सातव्या आवृत्तीची ऑनलाईन नावनोंदणी (स्थानिक वर्गातील) नियोजित तारखेच्या आधीच पूर्ण झाल्यामुळे हाफ मॅरेथॉनच्या वेब पोर्टलवर हाऊसफुल्लची पाटी लागली आहे.
2012 साली सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. हिल हाफ मॅरेथॉनच्या पहिल्याच स्पर्धेला जगभरातील व देशभरातील स्पर्धकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. साऊथ अफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेच्या धर्तीवर सुरु झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीमध्ये 21 किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार्यांची एकूण संख्या 225 होती. त्यामध्ये केवळ सातार्यातील दहाजणांचा सहभाग होता. त्यात एकही सातारकर महिला सहभागी झालेली नव्हती. 2 सप्टेंबर 2018 रोजी संपन्न होत असलेल्या हिल हाफ मॅरेथॉनच्या सातव्या आवृत्तीमध्ये सातार्याच्या सुमारे 2000 धावपटूंनी नावनोंदणी केली आहे, तर यामध्ये तब्बल चारशे महिलांचा समावेश आहे. सातव्या आवृत्तीसाठी एकूण 4000 स्पर्धकांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागाही येत्या काही दिवसांमध्ये नावनोंदणी होवून हाऊसफुल्ल होणार आहेत. सातारा बाहेरील स्पर्धकांची संख्या दरवेळेस चार हजारांपेक्षा जास्त असते. परंतू स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांसाठी येथील हॉटेल्सची संख्या अपुरी पडत असल्यामुळे आयोजकांना नाईलाजास्तव जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेता येत नाहीत. अन्यथा जगभरातील व देशभरातील सुमारे दहा हजार स्पर्धकही या स्पर्धेसाठी येवू शकतात, असे आयोजकांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले आहे.
सातारकर हे आरोग्याबाबत सजग झालेले आहेत. देशातील तसेच विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये सातारकर हळूहळू सहभागी व्हायला लागले आहेत. पूर्वी सातारकर कोणत्याही स्पर्धेसाठी वेळेत नावनोंदणी करीत नसत. उद्या करु, परवा करु, नंतर करु अशी चालढकल केल्यामुळे अनेकांना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येत नव्हते. परंतू सातारा हिल हाफ मॅरेथॉनने सातारकरांना वेळेत नोंदणी करण्यासाठी डेड लाईन ठेवल्यामुळे सातारकर सर्वच स्पर्धांच्या नावनोंदणीसाठी सजग झाले आहेत. त्यामुळेच यावर्षी होणार्या साताकरांनी एक पाऊल पुढे टाकत स्थानिक पातळीवर स्पर्धकांची नावनोंदणी नियोजित वेळेच्या अगोदरच केल्यामुळे सातारा जिल्हा हाफ मॅरेथॉनची नावनोंदणी ‘हाऊसफुल्ल’ झाली असल्याची माहिती सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |