01:50am | Jan 25, 2020 |
सातारा : बोधेवाडी घाटामध्ये काही दिवसांपूर्वी कार व मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेत सुमित मोरे याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र, या प्रकरणात ट्विस्ट आला असून दीड कोटी रूपयांच्या विमा रकमेच्या अमिषातून मयत असलेल्या सुमित मोरे यानेच आपला मित्र तानाजी बाबा आवळे यांचा खून करून हा सर्व बनाव केल्याचे उघड झाले आहे. मृत झालेली व्यक्ती ही सुमित मोरे आहे. हे लोकांना समजून यावे यासाठी स्वत:ची मारुती कार देखील सुमितने पेटवून दिली होती. याप्रकरणी संशयित आरोपी सुमित मोरे याला अटक करण्यात आली आहे.
सुमित मोरे याला मुंबईतील प्रोटीन व्यवसायात नुकसान झाले होते. त्यामुळे कर्ज देखील वाढले होते. या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने आयसीआयसीआय बँकेकडून दीड कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. स्वत:चा अपघाती मृत्यू घडवून विम्याचे पैसे मिळवून, मुंबईतून पलायन करण्याचा सुमित मोरे याचा विचार होता. त्यामुळे अपघाती मृत्यू घडवण्याच्या हेतूने तो सातत्याने दहिवडी परिसरात येत होता.
आपल्या काही खास आणि जवळच्या मित्रांना त्याने प्लॅन बोलून दाखवला होता. त्यामध्ये बराच खल झाल्यानंतर स्वत: सारखा हुबेहूब दिसणार्या व्यक्तीचा शोध सुमितने सुरु केला होता आणि त्याची नजर निढळ येथे टेलरिंग व्यवसाय शिकत असलेल्या उर्किडे येथील तानाजी बाबा आवळे याच्यावर गेली. तानाजी हा मित्र असल्याने सुमितने त्याच्यासोबत सलगी वाढवली व त्याला सतत बरोबर घेऊ लागला. अखेरीस तानाजी याचा गेम करायचा असे म्हणून सोमवारी त्याने तानाजीला अमिष दाखवून दहिवडीत बोलावून घेतले. आपल्याला गावाला जायचे आहे, असे सांगून त्याला बरोबर घेतले. त्यानंतर त्याच्या डोक्यात स्टंप मारुन, त्याला जागीच ठार मारले. प्लॅनप्रमाणे पिराच्या घाटात त्याचा मृतदेह पेटवून दिला आणि स्वत:ची गाडी देखील पेटवली.
ही घटना घडल्यानंतर मोरे कुटुंबियांचे आणि त्यांच्या नातलगांचे वागणे काहीच बदलले नव्हते. त्यांच्या चेहर्यावर कोठेही दु:खाची छाया दिसत नव्हती. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत वेळकाढूपणा देखील पोलिसांनी ओळखला होता. दरम्यानच्या काळात रजेवर असलेले पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड हे घटनेचे गांर्भीय ओळखून तात्काळ रुजू झाले. त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह वेगवेगळ्या टीम तयार करुन तपासाला गती दिली. मोरे कुटूंबियांचे वागणे विक्षिप्त असल्याने पोलिसांनी प्रथम सुमित मोरे याच्या भावावर लक्ष केंद्रीत केले. तो सातत्याने विसंगत माहिती देत असल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने घटनेची उकल केली.
जेजुरी, ता. पुरंदर येथे सुमित मोरे हा लपून बसला असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली. यानंतर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अवघ्या चार दिवसात गुन्हा उघडकीस आणला.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार घोरपडे, शंकर गुजर, हवालदार विलास यादव, नितीन भोसले, केंजळे, सचिन जगताप, तुषार आडके, उमेश गहीण, जी. बी. गंबरे, विजय खाडे, ज्ञानेश्वर यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |