सातारा : सातार्यातील माची पेठेत गिरण चालवणार्या वौशाली धनंजय खोत (वय 38) या महिलेचा मंगळवारी भरदिवसा डोक्यात नारळाची केसरे काढण्याच्या लोखंडी पहार डोक्यात खूपसून खून केल्याने परिसर हादरून गेला. दुपारी मुलगी कॉलेजमधून आल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर महिलेचा पती रिक्षाचालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, माची पेठेत खोत कुटुंबीय एक मुलगा व एक मुलगीसमवेत वास्तव्य करत आहेत. पती धनंजय खोत हा रिक्षाचाक असून पत्नी वैशाली या पिठाची गिरण व साड्यांना पिकू फॉल करत होत्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन्ही मुले कॉलेजला गेली होती. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलगी आल्यानंतर आई वैशाली खोत ही घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या घटनेने मुलगी घाबरली व आरडाओरडा करत बाहेर आली. युवती आरडाओरडा करत असल्याने परिसरातील नागरिक जमा झाले.
आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगताच काही नागरिकांनी घरात जावून पाहिले असता वैशाली खोत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या. या घटनेची शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पाहता पाहता बघ्यांची गर्दी उसळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दोन्ही मुलांशी पोलिसांनी प्राथमिक चर्चा केल्यानंतर त्यांनी वडील धनंजय खोत यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय खोत याचा मोबाईल क्रमांक, रिक्षा क्रमांक यासह प्राथमिक माहिती घेवून त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले.
वैशाली खोत यांचा खून झाल्याचे त्यांच्या कराड येथील माहेरी सांगण्यात आले. तोपर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दुपारी दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दुपारी अडीच वाजता मृत वैशाली यांच्या माहेरचे लोक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसानी सर्वांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी दोन्ही मुलांकडे आणखी माहिती घेवून दुपारी तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान, यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, धनंजय जांभळे यांनीही घटनास्थळी धाव घेवून पोलिसांना सहकार्य केले.
घटनेनंतर पोलीस पतीचा शोध घेत असून तो अजिंक्यतार्यावर रिक्षा घेऊन गेला असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तिकडेही गेले होते. मात्र रात्री उशीरापर्यं तो पसारच होता. दरम्यान, संशयित धनंजय खोत हा वारंवार पत्नी वैशाली खोत यांच्याशी भांडण करत होता. मंगळवारी सकाळीही तो भांडला होता व ‘तुला आज बघूनच घेतो,’ असे म्हटला होता. याबाबत मृत वैशाली खोत यांची मुलगी सृष्टी खोत हिने तक्रार दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |