सातारा : सातारा जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा नेते दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अध्यक्षपदी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवड केली असून दीपक पवार यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे. दीपक पवारांच्या निवडीमुळे जावली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यानंतर जावली तालुक्याला पुन्हा एकदा लाल दिवा मिळाला आहे.
दीपक पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याची हॅट्रिक साधली होती. जिल्ह्यात भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. याचीच पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अध्यक्षपदी निवड केली आहे. दीपक पवार यांच्या या निवडीमुळे भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढलेली आहे. दीपक पवार यांच्या निवडीमुळे जावली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |