कराड : कराड (कार्वे नाका) येथे चोरट्याने धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. मंगळवार (दि. 4) रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे कराड परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत चंद्रकांत हिंगमिरे यांच्या कार्वे नाका, शिक्षक कॉलनी, पाण्याची टाकीजवळ असलेल्या राहत्या घराचा दरवाजाचा व दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मनी मंगळसूत्र तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी जाताना त्यांच्याच दुकानातील साहित्यही चोरून नेले. हिंगमिरे यांचे घर व दुकानातील सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत चंद्रकांत हिंगमिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, याच परिसरात शिक्षक कॉलनी येथे विकास जगताप यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विकास जगताप गावी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दागिने रोख रक्कम घेऊन कपाटातील साहित्य विस्कटून चोरटे पसार झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून डीवायएसपी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |