02:52pm | Aug 24, 2019 |
सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषन व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला (डीबी) तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. यामध्ये फलटण येथे जनावरे चोरणारे, व सातार्यात केबल वायर, मोबाईल चोरी करणारी टोळी असे एकूण ७ जणांना गजाआड केले. सातारा पोलिसांनी शुक्रवारी या धडक कारवाई करत चोरट्यांना चेकमेट दिला. दरम्यान, संशयितांमध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
बुरुंगले वस्ती, राजाळे ता.फलटण येथील संशयितांनी १ गायी, १ वासरु चोरुन आणून ते घराजवळ बांधले असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जावून खातरजमा केली असता ती जनावरे चोरीची असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी याप्रकरणी सचिन लक्ष्मण बुरुंगले, नितीन लक्ष्मण बुरुंगले, विकास महादेव चोपडे, तुकाराम शिवाजी पांढरे (सर्व रा.राजाळे) यांना अटक केली. संशयितांनी चोरीची कबुली दिली असून ४० हजार रुपये किंमतीची चोरीची जनावरे ताब्यात घेतली.
सातारा एमआयडीसीमधून दि. १८ ऑगस्ट रोजी अर्शद पटेल यांची २० हजार रुपये किंमतीची केबल वायर गोडावूनमधून चोरी झालेली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. शहरचे डीबी पथक या चोरीचा तपास करत असताना त्यांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार वनाबाई भूजंग पारधी, उषा बाळू पारधी, सुजाता संजय अवघडे (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित महिलांनी चोरीची कबुली देवून चोरीचा माल पोलिसांना दिला.
दरम्यान, सातारा शहरातून मे महिन्यात दुचाकीच्या डीकीतून २५ हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल चोरी झाले होते. या मोबाईल चोरीचा छडा शहर डीबीच्या पथकाने लावला. यातील १ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणातील संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलिस त्याचा ताबा घेणार आहेे. संशयिताचा ताबा मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |