01:30am | Oct 22, 2019 |
सातारा : मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी फलटण पालिकेचा नगरसेवक तसेच विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचा खास 'यार' पांडुरंग गुंजवटेवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह फलटण येथील उपनगर असलेल्या मलठन येथे मतदान केंद्र पाहणीसाठी गेले होते त्यावेळी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे त्याच्या आठ ते दहा सहकाऱ्यांसोबत मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतराच्या आता खुर्च्या टाकून मतदान बसले होते. यावेळी पोलिसांनी पांडुरंग गुंजवटे सह त्याच्या सहकाऱ्यांना हटकले असता पांडुरंग गुंजवटे याने सहा.पोलीस निरीक्षक सचिन राऊळ यांना शिवीगाळ करत अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पांडुरंग गुंजवटेवर भादवी. ३५३,१७१(f) १८८ नुसार सरकारी कामामध्ये अडथळा आणणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पांडुरंग गुंजवटे हा विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचा खास 'यार' असून या अगोदर फलटण पालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा येथील न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. पांडुरंग गुंजवटे याला पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक तपास फलटण पोलीस ठाण्याचे पोनि. प्रताप पोमन करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |